NCB Arrested Mucchad Paanwala: ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला यांना अटक

बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर एनसीबीकडून या संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जात आहे. यातच आता मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाचे मालक रामकुमार तिवारी यांना अटक करण्यात आली आहे.

NCB Arrested Mucchad Paanwala: ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला यांना अटक
Muchhad Paanwala (Photo Credit: Twitter)

NCB Arrested Mucchad Paanwala: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर एनसीबीकडून या संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जात आहे. यातच आता मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाचे मालक रामकुमार तिवारी यांना अटक करण्यात आली आहे. रामकुमार तिवारी यांच्याकडून एनसीबीने ड्रग्ज सुद्धा जप्त केले आहेत.एनसीबीने सोमवारी मुच्छड पानवालाचे मालक जयशंकर तिवारी आणि रामकुमार तिवारी यांना ड्रग्ज प्रकरणी समन्स धाडल्यानंतर त्यांची खुप वेळ चौकशी केली गेली. रामकुमार तिवारी हा जयशंकर तिवारी याचा लहान भाऊ आहे. दोन्ही भावांचे दक्षिण मुंबईतील आलिशान परिसरात एक पानाचे दुकान आहे. जयशंकर तिवारी आणि रामकुमार तिवारी 6-6 महिने चालवतात. या पानाच्या दुकानात बॉलिवूड आणि उद्योगधंद्यातील प्रसिद्ध व्यक्ती पान खाण्यासाठी येत असतात.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुच्छड पानवालाच्या दुकानातून ड्रग्ज सुद्धा जप्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वी एनसीबीने मुंबईतून 200 किलो ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणी अभिनेत्री दीया मिर्जा हिची एक्स मॅनेजर राहिला फर्नीचरवाला आणि एक ब्रिटिश नागरिक करन सजनानी याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. या लोकांची चौकशी केल्यानंतर मुच्छड पानवाला याचे नाव समोर आले. चौकशी दरम्यान असे समोर आले की, रामकुमार तिवारी याचा सुद्धा ड्रग्ज प्रकरणात समावेश आहे.(NCB Summons Mumbai's Famous Muchhad Paanwala: ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध दुकान मुच्छड पानवालाच्या मालकाचे नाव समोर, एनसीबीने बजावले समन्स)

Tweet:

एनसीबीच्या मते या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या करन सजनानी हा सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणाशी संलग्न आहे. करन सजनानी हा अनुज केसवानी याला ड्रग्जचा पुरवत होता. अनुज केसवानी याला पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झालेल्या ड्रग्ज संबंधित अटक केली आहे.

तर मुच्छड पानवाला याचा धंदा मुंबईत 1977 पासून सुरु आहे. दक्षिण मुंबईतील आलिशान परिसरात त्याचे दुकान असून बहुतांशजण त्याच्याकडे पान खाण्यासाठी येत असतात. मुच्छड पानवाला याची वेबसाइट सुद्धा आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्या सुद्धा या दुकानातून ऑर्डर देतात. त्याचसोबत मोठमोठ्या इवेंट्स आणि कार्यक्रमांमध्ये मुच्छड पानवाल्याकडून पान मागवले जाते.

(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2021 09:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).