Muchhad Paanwala (Photo Credit: Twitter)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनविरोधात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) कडक कारवाईला सुरुवात केली आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात दोन दिवसांपूर्वी दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि त्यांच्या बहिणीसह अन्य दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आता मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला (Muchhad Paanwala) दुकानाचे मालक जयशंकर तिवारी यांचे नाव समोर आले आहे. यामुळे ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने जयशंकर तिवारी यांना समन्स बजावण्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिया मिर्याची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुच्छड पानवाला यांना समन्स बजावण्यात आले आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी दोन दिवसांपूर्वी रोहिला फर्निचरवाला यांच्यासह करन सजनानी, शाइस्ता हिला पकडले होते. त्यावेळी एनसीबीने यांच्याकडून तब्बल 200 किलो गांजा जप्त केला आहे. चौकशीदरम्यान एनसीबीला कळले की, करण सजनानी हा ब्रिटीश नागरिक मुच्छड पानवालाला गांजाचा पुरवठा करतो. करण सजनानी यांच्या निवेदनात मुच्छड पानवालाचे नाव समोर आल्यानंतर एनसीबीने समन्स पाठवले आहे. या माहितीनंतर आता मुच्छड पानवाला एनसीबीच्या रडारवर आहे. एनसीबीचे अधिकारी आता या पान दुकानाच्या मालकाची चौकशी करणार आहेत. हे दुकान दक्षिण मुंबईतील केम्प कॉर्नरमध्ये आहे. या दुकानात पानमध्ये ड्रग्ज मिळवून दिले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- मुंबई: पोलिसांना मारहाण केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी राम कदमांचा पोलिसांना फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल

मुच्छड पानवाला हे मुंबईतील प्रसिद्ध पानाचे दुकान आहे. या दुकानातील पान खाण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसह मुंबईतील मोठे उद्योगपतीदेखील येत होते. प्रसार माध्यमांत झळकत असलेल्या वृत्तानुसार, आरोपी मुच्छद पानवालाला ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे म्हंटले गेले आहे. ड्रग्ज आणि पानवाला यांच्यातील संबंध काही नवीन नाही. याआधीही अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, जिथे पान विकणाऱ्या लोकांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली गेली आहे.