Bollywood Drug Case: अभिनेता Gaurav Dixit ला ड्रग केसमध्ये अटक; घरातून मिळाले MD आणि चरस, 30 ऑगस्टपर्यंत कोठडीत
Gaurav Dixit (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलीवूडमध्ये सुरु असलेल्या ड्रग व्यवसायाबाबत (Bollywood Drug Case) एनसीबीने (NCB) आणखी एक कारवाई केली आहे. एनसीबीने टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला (Gaurav Dixit) अटक केली आहे. त्याच्या घरातून एमडी आणि चरस जप्त केल्यानंतर एनसीबीने गौरववर ही मोठी कारवाई केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर, एनसीबी बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांची सतत चौकशी आणि कारवाई करत आहे. यापूर्वीही या प्रकरणात अनेकांना अटक झाली आहे. बॉलिवूडच्या ‘ए’ ग्रेड कलाकारांव्यतिरिक्त, एनसीबीने इतर टीव्ही कलाकारांवरही पकड घट्ट केली आहे. अभिनेता एजाज खानच्या चौकशीनंतर एनसीबीने गौरव दीक्षितवर ही कारवाई केली आहे.

गौरव दीक्षितला 30 ऑगस्टपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. आता तो 30 ऑगस्टपर्यंत एनसीबीच्या ताब्यात राहील. अलीकडेच, टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस फेम एजाज खानला ड्रग्सच्या संदर्भात ताब्यात घेण्यात आले. याबाबत एनसीबीने त्याची विचारपूस केली असता त्यात आणखी बरीच नावे समोर आली. यामुळे, अनेक टीव्ही कलाकारांची चौकशी करण्यात आली आणि एकापाठोपाठ छापे टाकण्यात आले.

एप्रिलमध्ये एनसीबीने गौरव दीक्षितच्या लोखंडवाला निवासस्थानावरून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले होते. घरी परतत असताना गौरवच्या मित्राने एजन्सीच्या अधिकाऱ्यांना पाहिले आणि त्यानंतर दोघेही पळून गेले. एजन्सी तेव्हापासून गौरवचा शोध घेत होती. गौरव एका परदेशी महिलेसोबत राहत होता, ती महिलाही घरातून बेपत्ता होती. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी गौरव दीक्षितच्या अटकेची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, ज्या ड्रग पुरवठादाराच्या मदतीने एजाज खान पकडला गेला, त्यानेच गौरव दीक्षितचेही नाव घेतले होते. (हेही वाचा: Super Dancer 4 शोमध्ये परतली शिल्पा शेट्टी; पहा व्हिडिओ)

दरम्यान, गौरव भोपाळचा रहिवासी असून त्याने पॉवर इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनीअरिंग केले आहे. नंतर गौरवने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि अभिनेता बनला. 2006-2007 मध्ये त्यांनी टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘मोहल्ला मोहब्बत वाला’ मध्ये काम केले. गौरवने 'फन कॅन बी डेंजरस', 'बॉबी लव्ह अँड लस्ट', 'डायरी ऑफ बटरफ्लाय', 'द मॅजिक ऑफ सिनेमा', 'बुलेट राजा' आणि 'हॅपी भाग जायेगी' या चित्रपटांमध्येही काम केले. गौरवने 'सीता और गीता' या मालिकेतही काम केले आहे.