
Navi Mumbai News: दोन रिक्षा (Auto Riksha) चोरीच्या गुन्हांमध्ये सहभागी असलेल्या 31 वर्षीय तरुणाला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षा चोरीच्या दोन गुन्ह्यांची उघडणी पोलीसांनी केली आहे. सुनील चव्हाण असं या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलीसांच्या मदतीने बसस्टॅंड चौकी, शिवाजी नगर पुणे येथून अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी या आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला.
पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सावरकर चौकातून 40 हजार रुपयांची रिक्षा चोरीला गेल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, पनवेलच्या लगतच्या परिसरात 25,000 रुपये किमतीची आणखी एक रिक्षाही चोरीला गेली. पोलिसांनी सांगितले की, “आम्ही आरोपींकडून दोन रिक्षा जप्त केल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार, पोलीस हवालदार सूर्यकांत कुडावकर, पोलीस नाईक महेश पाटील, पोलीस नाईक अमोल प्रल्हाद पाटील, पोलीस नाईक अशोक राठोड, पोलीस शिपाई दहिजे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा पुण्यात शोध लागला. बसस्टँड चौकी, शिवाजी नगर, पुणे येथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. आरोपी चव्हाण याने चौकशीत दोन रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.