Ranveer Allahbadia फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

Ranveer Allahbadia Controversy: समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये पालकांबद्दल केलेल्या विनोदामुळे प्रसिद्ध युट्यूबर रणवीर इलाहाबादिया (Ranveer Allahbadia) गेल्या काही काळापासून अडचणीत सापडला आहे. त्याच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. रणवीर इलाहाबादिया यांनी त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचा पासपोर्ट सोडण्याची विनंती न्यायालयाला केली होती. आता यावर सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) प्रतिक्रिया आली आहे. रणवीर इलाहाबादिया यांच्या पासपोर्ट जारी करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सोमवारी सुनावणी होईल. त्यामुळे रणवीर इलाहाबादिया यांच्या अटकेवरील बंदी एका आठवड्यासाठी वाढवण्यात आली आहे. यासोबतच न्यायालयाने रणवीर इलाहाबादिया यांना एक सूचनाही दिली आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे की, ते एका आठवड्यानंतर पासपोर्ट जारी करण्याचा विचार करतील. या काळात, रणवीरला याचिकाकर्ता म्हणून संपूर्ण माहिती द्यावी लागेल जेणेकरून त्याचा पासपोर्ट बनवता येईल. तथापी, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आमचा सल्ला असा आहे की तुम्ही रिट याचिका दाखल करा, तुम्हाला हवा असलेला दिलासा रिट याचिकेत अधिक प्रभावीपणे दिला जाऊ शकतो. (हेही वाचा - Ranveer Allahbadia Controversy: रणवीर अलाहाबादिया यास अटक? 'इंडियाज गॉट लेटेंट' वादात आज महत्त्वाचा निर्णय अपेक्षीत)

एसजी तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, महाराष्ट्रात अलाहाबादिया प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. तर आसाम प्रकरणात एका आरोपीला उद्या समन्स बजावण्यात आले आहे. रणवीरने अलीकडेच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, असे बरेच दिवस आले आहेत जेव्हा त्याला तुटलेले आणि एकटे वाटले. आयुष्याच्या या टप्प्यावर त्याला आता कुटुंब, मित्र आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व कळले आहे. (हेही वाचा - SC On Ranveer Allahbadia: रणवीर इलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; शो सुरू करण्याची मिळाली परवानगी)

रणवीर हा एक प्रसिद्ध युट्यूबर असून आक्षेपार्ह विनोद केल्यानंतर त्याला समन्स बजावण्यात आले होते. सध्या तो जामिनावर असून त्याने न्यायालयाला त्याचा पासपोर्ट सोडण्याची विनंती केली आहे. तथापि, गुन्हे शाखेने युट्यूबरवर तपासात योग्य सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे.