Ranveer Allahbadia | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कॉमेडियन समय रैना (Samay Raina) याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' (India’s Got Latent) या यूट्यूब शोमध्ये केलेल्या कथित अश्लील टिप्पणीवरून त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक एफआयआर एकत्र करण्याची मागणी करणाऱ्या युट्यूबर आणि प्रभावक अभिनेता रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) याच्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सुनावणी करणार आहे. या आधी अलाहाबादिया यास विविध राज्यांच्या पोलिसांकडून अनेक समन्स जारी झाली आहेत. मात्र, त्याने कोणत्याही राज्याच्या तपास यंत्रणांशी संपर्क साधला नाही. मुंबई सायबर सेल (Maharashtra Cyber Cell) आणि इतर राज्यांच्या पोलिसांनी संयुक्तरित्या प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आज न्यायालयात होणाऱ्या सुनावनीत या वादातील आरोपींना अटक करण्याबाबत आदेश दिले जाणार का? याबाबत उत्सुकता आहे. न्यायाधीश सूर्यकांत आणि एन कोटीश्वर सिंह यांचे खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे.

कायदेशीर लढाई आणि सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप

भारताचे माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे पुत्र अभिनव चंद्रचूड यांनी तातडीने केलेल्या विनंतीनंतर ही याचिका दाखल करण्यात आली. मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांनी आश्वासन म्हटले की, हा खटला दोन ते तीन दिवसांत सुनावणीसाठी सूचीबद्ध केला जाईल. (हेही वाचा, India's Got Latent Controversy: युट्यूबर रणवीर अलाहाबादिया संपर्कात नाही; मुंबई पोलिसांची 'इंडियाज गॉट लेटेंट' वाद प्रकरणी माहती)

रणवीर अलाहाबादिया याच्यावर गुन्हा दाखल होण्याचे कारण काय?

युट्युब मंचावरुन समय कॉमेडीयन रैना याच्याकडून 'इंडियाज गॉट लॅटेंट' हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाचे अनेक भाग या मंचावर प्रसारित झाले आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाच्या अशाच एका भागात रणवीर अलाहाबादिया याने आईवडील आणि पालक यांच्यातील लैंगिक संबंधावरुन अनुचित उद्गार काढले. ज्यामुळे सोशल मीडियावर संताप आणि जनमानसात संतापाची तीव्र लाट निर्माण झाली. त्यामुळे त्याने केलेल्या आक्षेपार्ह आणि अनुचित वर्तव्यावरुन स्वत: रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि इतरांवर तक्रारी दाखल झाल्या. ज्यावरुन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. एफआयआरच्या माध्यमातून हे गुन्हे विविध राज्यांमध्ये दाखल झाले आहेत. (हेही वाचा, India’s Got Latent Case: इंडियाज गॉट लेटेंट शोच्या सर्व सदस्यांविरुद्ध FIR दाखल)

गुन्हे दाखल झालेल्यांची नावे

'इंडियाज गॉट लॅटेंट' कार्यक्रमात झालेल्या अनुचित टीप्पणी प्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी प्रमुख नावे खालील प्रमाणे:

  • समय रैना (होस्ट)
  • रणवीर अलाहाबादिया (प्रभावक आणि वक्तव्य करणारा व्यक्ती)
  • आशिष चंचलानी (यूट्यूब क्रिएटर)
  • जसप्रीत सिंग (कॉमेडियन)
  • अपूर्व मखीजा (प्रभावकारी)

दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या आहेत. ज्यामध्ये विविध घटनांचा समावेश आहे. या घडामोडींपैकी महत्त्वाच्या खालील प्रमाणे:

रणवीर अलाहाबादिया याचा संपर्क नाही: मुंबई आणि गुवाहाटी पोलिसांनी संयुक्त निवेदनात पुष्टी केली आहे की अलाहाबादिया याच्याशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न करूनही त्यांनी कायदा अंमलबजावणी संस्थांना प्रतिसाद दिला नाही.

  • विविध राज्यांच्या पोलिसांकडून गुन्हा दाखल: अलाहाबादिया याच्याविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले आहेत. सदर राज्यांतील संस्था या प्रकरणाचा तपास करत आहेत. या संस्था आणि राज्ये पुढील प्रमाणे:

  1. महाराष्ट्र सायबर विभाग
  2. गुवाहाटी पोलिस
  3. जयपूर पोलिस

  • रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांना समन्स जारी: महाराष्ट्र सायबर सेलने अलाहाबादिया यास 24 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे समन्स जारी केले आहे. तर समय रैना यास 18 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश आहेत.
  • राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) द्वारे कारवाई: एनसीडब्ल्यूने अलाहाबादिया, रैना आणि इतर संबंधित व्यक्तींना समन्स जारी केले आहेत, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

  1. अपूर्वा मखीजा
  2. जसप्रीत सिंग
  3. आशिष चंचलानी
  4. तुषार पुजारी (निर्माता)
  5. सौरभ बोथरा (निर्माता)

दरम्यान, याच प्रकरणात मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीत आरोप आहे की, या शोमध्ये महिलांबद्दल अपशब्द आणि अश्लील टिप्पणी होती, ज्याचा वापर लोकप्रियता आणि आर्थिक फायदा मिळविण्यासाठी केला जात होता.

इंडियाज गॉट लेटेंट दरम्यान रणवीर अलाहबादिया यांनी "पालक आणि लैंगिकता" या विषयावर केलेल्या टिप्पणीमुळे हा वाद निर्माण झाला. या प्रतिक्रियेमुळे हा शो YouTube वरून काढून टाकण्यात आला. अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरू ठेवली आहे, अनेक राज्यांमध्ये कायदेशीर कारवाई सुरू आहे.