Ranveer Allahbadia (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

YouTuber News: मुंबई आणि गुवाहाटी पोलिसांनी संयुक्त निवेदन जारी करून पुष्टी केली आहे की, युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) तपास संस्थांना प्रतिसाद देत नाही. 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) या वादग्रस्त शोच्या संदर्भात महाराष्ट्र सायबर विभाग (Maharashtra Cyber Cell), गुवाहाटी पोलिस आणि जयपूर पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक एफआयआरमध्ये अलाहाबादियाचे नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले. मात्र, अनेकदा समन्स बजावूनही त्याचा पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. 'आई-वडील आणि पालक यांच्यातील लैंगिक संबंध' याबद्दल अनुचित वक्तव्य केल्यामुळे अलाहाबादिया वादात सापडला आहे. या प्रकरणात उपरती झाल्यानंतर त्याने माफी देखील मागितली परंतू, त्यावर कायदेशीररित्या तक्रार आणि गुन्हा दाखल झाला आहे.

रणवीर अलाहाबादियाविरुद्ध अनेक गुन्हे दाखल

वेगवेगळ्या राज्यांच्या पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनानुसार रणवीर अलाहाबादिया याच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी पोलिसांनी त्याला अनेकदा समन्स पाठवले आहे. मात्र, असे असले तरी त्याने तपास यंत्रणेशी अद्याप तरी संपर्क साधला नाही. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांना 24 फेब्रुवारी रोजी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत, जेणेकरून शोमधील त्यांच्या वक्तव्यांवरील आरोपांची उत्तरे दिली जातील. (हेही वाचा, India’s Got Latent Case: इंडियाज गॉट लेटेंट शोच्या सर्व सदस्यांविरुद्ध FIR दाखल)

या प्रकरणाने देशभरात लक्ष वेधले आहे, ज्यामुळे अनेक कायदा अंमलबजावणी संस्थांना कारवाई करण्यास भाग पाडले आहे. महाराष्ट्राच्या सायबर सेलने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे, अधिकाऱ्यांना कायदेशीर प्रक्रियेत अलाहाबादिया यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

समय रैना आणि इतरांनाही समन्स

रणवीर अलाहाबादिया याच्याव्यतिरिक्त, विनोदी कलाकार समय रैना यांलाही 18 फेब्रुवारी रोजी सायबर सेलसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि अलाहाबादिया, रैना आणि इतरांना समन्स बजावले आहेत. तथापि, सुरक्षेच्या चिंता, पूर्वीच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन आणि लॉजिस्टिक समस्यांमुळे या प्रकणातील अनेक व्यक्ती आयोगासमोर हजर राहू शकल्या नाहीत. (हेही वाचा, India's Got Latent Controversy: 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील Ranveer Allahbadia च्या 'त्या' प्रश्नाबाबतचा वाद चिघळला; महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंत, सिद्धांत चतुर्वेदी, उर्फी जावेदसह अनेकांना बजावले समन्स)

रणवीर अलाहाबादिया याने राष्ट्रीय महिला आयोगाला कळवले आहे की, त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे चौकशीला सामोरे जाण्यासाठी त्याने मुदतवाढ मागितली आहे. आयोगाने त्यांची याचिका मान्य केली आहे आणि सुनावणी 6 मार्च रोजी पुन्हा निश्चित केली आहे.

समय रैनाने माफी मागितली, व्हिडिओ काढून टाकले

दरम्यान, जनमानसातील तीव्र भावना आणि सोशल मीडियावर व्यक्त होत असलेला संताप. या पार्श्वभूमीवर सम रैना याने त्याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' कार्यक्रमाचा भाग असलेला तो वादग्रस्त व्हिडिओ युट्युबवरु हटवला आहे. खरे तर युट्युबनेच कारवाई करुन हा व्हिडिओ हटविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रैना याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सार्वजनिक माफी मागितली आणि वादाबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी म्हटले: जे काही घडत आहे ते माझ्यासाठी खूप जास्त आहे. मी माझ्या चॅनेलवरून 'इंडियाज गॉट लेटेंट' व्हिडिओ काढून टाकले आहेत. माझा एकमेव उद्देश लोकांना हसवणे आणि चांगला वेळ घालवणे हा होता. त्यांच्या चौकशी निष्पक्षपणे पूर्ण व्हाव्यात यासाठी मी सर्व एजन्सींना पूर्ण सहकार्य करेन. धन्यवाद.