आसावरी जगदाळे | X @ANI

पुण्यामध्ये आज संतोष जगदाळे (Santosh Jagdale) आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. पहलगाम मध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये या दोन मित्रांचा मृत्यू झाला. पुण्यात त्यांचे पार्थिव झाल्यानंतर आज 24 एप्रिलच्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आहेत. आज पुण्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार केले आहेत. संतोष यांची मुलगी आसावरी जगदाळेने (Asavari Jagdale) वडिलांच्या अंत्यसंस्कारांमध्ये सहभाग घेतला होता.

आसावरीने हल्ल्याच्या रात्री मीडीयाशी बोलताना दहशतवाद्यांनी वडील संतोष जगदाळे यांना इस्लामिक श्लोक म्हणायला सांगितले. ते म्हणू न शकल्याने त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. हल्ल्यावेळी अंगावर जे कपडे होते, ज्यावर रक्ताचे शिंतोडे पडले होते, त्याच कपड्यांनी आसावरीने आज पुण्यामध्ये वडिलांना अग्नी दिला आहे. नक्की वाचा: Terrorist Attack in Pahalgam: हल्लेखोरांनी पीएम मोदींची निंदा केली, वडिलांना इस्लामिक श्लोक म्हणायला लावले; पुण्याच्या जखमी संतोष जगदाळे यांंची लेक आसावरी जगदाळे ने सांगितला थरारक प्रसंग. 

शरद पवार यांनी घेतलं संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

लेक आसावरी कडून अंत्यविधी

जगदाळे कुटुंबीय पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहतात. तर गणबोटे कुटुंबीय हे पुण्यातील रास्ता पेठेत राहतात. आसावरी जगदाळे सोबत तिचे वडील संतोष जगदाळे, आई प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे यांचे मित्र कौस्तुभ गनबोटे आणि त्यांची पत्नी संगीता गनबोटे हे काश्मिरमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. यामध्ये संतोष आणि कौस्तुभ यांच्यावर गोळ्या झाडून दहशतवाद्यांनी त्यांना ठार केले आहे.

'देशभरातील निष्पाप पर्यटक अशा भ्याड हल्ल्याचा बळी ठरावेत, ही बाब अंतःकरणाला चटका लावणारी आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. अशा अतिरेकी कृत्यांना छेद देणे आणि देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे, आजच्या काळाची गरज आहे.' अशी भावना शरद पवार यांनी पोस्ट केली आहे.