
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत (Pahalgam Terrorist Attack) संशयाचे बोट थेट पाकिस्तानकडे जात आहे. अशात पाकिस्तान सरकारकडून याबाबत पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Defense Minister Khawaja Asif) यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशाचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, ख्वाजा आसिफ म्हणाले, ‘या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नाही, याच्याशी काहीही संबंध नाही. यामागे स्थानिक लोक असू शकतात. भारतात अनेक संघटना आहेत, त्यांच्यात देशांतर्गत पातळीवर बंडखोरी आहे.’ भारताने ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यांना ‘निराधार’ आणि ‘दिशाभूल करणारे’ म्हणत तीव्र निषेध केला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, पाकिस्तानचा LeT आणि इतर दहशतवादी गटांना दीर्घकाळ पाठिंबा आहे,
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ, जे PML-N पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे जवळचे सहकारी आहेत, यांनी 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नसल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला पाठिंबा देत नाही. त्यांनी पुढे विवादास्पद वक्तव्य केले की, हा हल्ला भारतामधील आणि जम्मू आणि काश्मीरमधील ‘स्थानिक बंडखोरी’ आणि ‘स्वदेशी शक्तीं’चा परिणाम आहे. भारतामध्ये नागालँडपासून मणिपूर आणि काश्मीरपर्यंत, लोक सरकारच्या विरोधात आहेत. भारत सरकार लोकांच्या हक्कांची हत्या करत आहे. ती त्यांचे शोषण करत आहे. लोक या विरोधात उभे राहिले आहेत.
मंगळवारी हा हल्ला दुपारी सुमारे 2:30 वाजता पहलगामपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसारनच्या निसर्गरम्य मैदानात घडला, जिथे पर्यटक ट्रेकिंग आणि विश्रांतीसाठी येतात. सशस्त्र दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामुळे 26 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. पहलगामच्या जंगलात राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे मोठे ऑपरेशन सुरू आहे. या शोध मोहिमेत लष्कराचे हेलिकॉप्टर, ड्रोन आणि स्निफर डॉग देखील तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा: Pahalgam Terrorist Attack: पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतले; पहलगाम हल्ल्याबाबत विमानतळावरच घेतला NSA आणि EAM कडून आढावा, आज होणार उच्चस्तरीय बैठक)
Defence Minister 's Controversial Statement on India:
गुप्तचर यंत्रणांनी LeT चा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरी याला या हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून ओळखले, ज्याचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध असल्याचा संशय आहे. TRF ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, हा हल्ला पर्यटकांना लक्ष्य करणारा काश्मीरमधील अलीकडील काळातील सर्वात मोठा नागरी हल्ला आहे, असे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले. एका दहशतवाद्याचा AK-47 सह फोटो प्राप्त झाला असून, तो हल्ल्याशी संबंधित असल्याचा संशय आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला हा भारताच्या सुरक्षेसाठी आणि काश्मीरच्या शांततेसाठी एक मोठा धक्का आहेपाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी हल्ल्यात सहभाग नाकारला असला, तरी त्यांच्या ‘स्थानिक बंडखोरी’ च्या वक्तव्याने आणि शहबाज शरीफ यांच्या काश्मीरवरील टिप्पणीने भारताचा रोष ओढवला आहे.