Pahalgam Terror Attack: जम्मू- काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांना परत आणण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; पर्यटकांना घेऊन आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार

एअर इंडियाचे हे विमान 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईत येईल. अशाप्रकारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत.

Pahalgam Terror Attack: जम्मू- काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांना परत आणण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; पर्यटकांना घेऊन आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार
Flight प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credit- X)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यानंतर, 24 एप्रिल 2025 रोजी श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. यासह आणखी एका विमानाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. एअर इंडियाचे हे विमान 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईत येईल. अशाप्रकारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य शासन करणार आहे, असे एक्सच्या सीएमओ महाराष्ट्र या हॅण्डलवर नमूद करण्यात आले आहे. यासह जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या पार्थिवांची व्यवस्था आणि जखमींच्या मदतीसाठी, महाराष्ट्र सदन सक्रियपणे कार्यरत आहे. (हेही वाचा: PM Narendra Modi On Pahalgam Terror Attack: 'दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त केला निर्धार)

Pahalgam Terror Attack:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2025 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).