Divorced Couple | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench of Mumbai High Court) एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पती-पत्नीचा घटस्फोट (Divorce) झाला असला आणि कन्या तिच्या आईसोबत राहत असली तरी वडिलांना जबाबदारी झटकता येणार नाही. पती-पत्नी घटस्फोटीत (Divorced Couple ) असली तरी कन्येच्या विवाहाची जबाबदारी ही पित्याचीच आहे. त्यामुळे कन्येच्या विवाहाची आर्थिक जबाबदारी ही वडिलांना उचलावी लागेल, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. एका कौटुंबीक खटल्यात न्यायालयाने हा निर्वाळा दिला आहे.

नागपूर खंडपीठाकडे आलेल्या एका प्रकरणातील दाम्पत्याचा विवाह 1991 मध्ये झाला होता. या विवाहातून या दाम्पत्यास दोन अपत्ये झाली.एक मुलगा एक मुलगी. पुढे या दाम्पत्याचा घटस्फोट झाला. घटस्फोट प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार पत्नीला पोटगी सुरु झाली. तसेच, ही दोन्ही मुले आईसोबत राहा होती. दरम्यान, दोनपैकी एका मुलाचे 2014 मध्ये लग्न झाले.या लग्नस साधारण 3 लाख रुपयांचा खर्च आला. (हेही वाचा, 'Skin to Skin' Contact: NCW च्या Bombay High Court च्या निर्णया विरूद्ध याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणीला परवानगी; महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवत मागवला अहवाल)

दरम्यान, या दाम्पत्यातील महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली की, मुलांच्या लग्नाचा अर्धा खर्च वडील या नात्याने उचलला जावा. महिलेने दाखल केलेल्या याचिकेला वडिल असलेल्या गृहस्थांनी आव्हान दिले. एकमेकांविरुद्ध आलेल्या दोन्ही याचिकांवर न्या. अतुल चांदुरकर आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

न्या. अतुल चांदुरकर आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठासमोर जालेल्या सुनावणीत दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने निर्वाळा दिला. या वेळी न्यायालयाने निर्वाळा देत सांगितले की, पती-पत्नीचा घटस्फोट झाला असला आणि कन्या तिच्या आईसोबत राहत असली तरी वडिलांना जबाबदारी झटकता येणार नाही. पती-पत्नी घटस्फोटीत असली तरी कन्येच्या विवाहाची जबाबदारी ही पित्याचीच आहे. न्यायालयाेन सदर महिलेला मुलांच्या लग्नासाठीच्या खर्चातील विशिष्ठ रक्कम पुढील आठ दिवसांमध्ये द्यावेत असे आदेश दिले.