Close
Search

चोरी, घरफोडी अशा घटना घडूनही घरांच्या सुरक्षेत मुंबईकर देशात अव्वल!

जीएसएस (GSS) ही सुरक्षाविषयक उत्पादने निर्माण करणारी देशातील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीच्या सर्व्हेनुसार सुरक्षेच्या बाबतीत मुंबईकर अधिक जागरूक आहेत. ते आपल्या घराच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेतात. अर्थात, एक-चतुर्थांशपेक्षा जास्त मुंबईकरांना घरफोडीचा दणका बसाला आहे हेही सर्व्हेतील निष्कर्ष सांगतो.

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे|
चोरी, घरफोडी अशा घटना घडूनही घरांच्या सुरक्षेत मुंबईकर देशात अव्वल!
house security | (Photo credit: archived, edited, representative image)

महानगरी मुंबईत(Mumbai) दररोज कुठे ना कुठे घरफोडी, चोरी अशा घटना घडल्या असल्या तरीसुद्धा घरांच्या सुरक्षिततेबाबत मुंबईकरच अव्वल आहेत. हे आम्ही नव्हे तर सर्व्हेतला निष्कर्षच सांगतो आहे. गोदरेज सिक्युरिटी सोलुशन्स (Godrej Security Solutions) या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणातील अहवाल जाहीर केला. जीएसएस (GSS) ही सुरक्षाविषयक उत्पादने निर्माण करणारी देशातील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीच्या सर्व्हेनुसार सुरक्षेच्या बाबतीत मुंबईकर अधिक जागरूक आहेत. ते आपल्या घराच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेतात. अर्थात, एक-चतुर्थांशपेक्षा जास्त मुंबईकरांना घरफोडीचा दणका बसाला आहे हेही सर्व्हेतील निष्कर्ष सांगतो.

जीएसएसच्या सर्व्हेतून विविध शहरांमधील नागरिकांच्या सुरक्षाविषयक सवयींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्या एक-चतुर्थांश मुंबईकरांना घरफोडीचा दणका बसला आहे त्या मुंबईकरांना आजही घडल्या प्रकाराबद्दल हळहळ वाटते. तसेच, असा प्रकार पुन्हाही आपल्यासोबत घडू शकतो असे वाटते. असे हा सर्व्हे सांगतो. सुमारे ३६.८% मुंबईकर त्यांच्या मौल्यवान वस्तू घरांतील कपाटांमध्ये ठेवणे पसंत करतात. तर, मौल्यवान वस्तू घरांतील कपाटात ठेवणाऱ्या मंडळींचे राष्ट्रीय स्तरावरील प्रमाण सरासरी ५२.४% पेक्षाही अधिक आहे.

दरम्यान, आपल्या घरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईकर अधिक जागरुक असतात. इतके की, केवळ 15 मिनिटांसाठी जरी घराबाहेर पडायचे असले तरी ५८.७% मुंबईकर घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लाऊनच ते बाहेर पडतात. राष्ट्रीय पातळीवर असे करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण केवळ ३७.२% आहे. गृहसुरक्षेबाबत दक्ष असणाऱ्या मुंबईकरांना आपल्या पाकिटाबाबत मात्र भलतीच चिंता वाटते. त्यांना आपले पाकीट हरवू शकते ही सतत भीती वाटते. अशी भीती वाटणाऱ्या मुंबईकरांचे प्रमाण ८१% आहे. राष्ट्रीय पातळीवर असा विचार करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ५१.८% इतके आहे. ६९% मुंबईकर आपल्या घराच्या किल्ल्या शेजाऱ्यांकडे ठेवून निर्धास्त राहतात. तर देशभरातील इतर शहरात असे शेजाऱ्यांवर विसंबून राहणाऱ्यांचे प्रमाण ४७% इतके आहे. (हेही वाचा, मुंबईमध्ये घर खरेदी महाग होणार ! Stamp duty मध्ये 1% वाढीचं विधेयक विधानसभेत मंजूर)

जवळपास एक-चतुर्थांश मुंबईकरांच्या बाबतीत घरफोडी करण्याचे प्रयत्न करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांना अशीही काळजी वाटते की तसे पुन्हा होऊ शकते. त्यामुळे फक्त ३६.८% मुंबईकर त्यांच्या मौल्यवान वस्तू घरातील कपाटांमध्ये ठेवतात तर राष्ट्रीय पातळीवर याची सरासरी ५२.४% पेक्षा जास्त आहे. मुंबईकर खूप जागरूक असतात असेही आढळून आले आहे. ५८.७% मुंबईकर १५ मिनिटांसाठी जरी बाहेर पडायचे असेल तरी घराचा मुख्य दरवाजा कुलूप लावून बंद करतात. ही सवय असण्याची राष्ट्रीय सरासरी फक्त ३७.२% आहे. कधीही न झोपणाऱ्या या शहरातील ८१% नागरिक असे मानतात की त्यांचे पैशाचे पाकीट हरवू शकते तर इतर शहरांमधील फक्त ५१.८% लोकांनाच तसे वाटते. मुंबईकरांची त्यांच्या शेजाऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवयदेखील बऱ्याच जास्त प्रमाणात आहे. ६९% मुंबईकर आपल्या घराच्या किल्ल्या शेजाऱ्यांकडे ठेवण्याची जोखीम घेतात तर देशातील इतर सर्व शहरांमध्ये फक्त ४७% लोक असे करतात.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel