Suicide Over Blackmail: सिनेमात काम करण्याचे स्वप्न असलेल्या एका महिलेच्या अपेक्षांचा भंग झाल्याने तिने वेश्याव्यवसाय सुरु केला होता. पण तिला चार व्यक्तींनी ते एनसीबी अधिकारी असल्याचे सांगत ब्लॅकमेल केले. त्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबद्दल आंबोली पोलिसांनी तपास केला आहे.(Thane: बाळाच्या मृत्यूसाठी जन्मदात्या आईला अटक, असा झाला घटनेचा खुलासा)
पोलिसांच्या मते, महिला पश्चिम बंगाल येथून मुंबईत आली होती. येथे येऊन तिला अभिनेत्री व्हायचे होते. परंतु महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसानंतर आरोपी सुरज परदेशी, प्रविण वालींबे याच्यासह त्याच्या साथीदारांनी तिच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी करत तिच्या वेश्याव्यवसायाबद्दल तपास करु अशी धमकी दिली होती.(Shakti Law: महाराष्ट्राच्या शक्ती कायद्याला मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तींचा विरोध, म्हणाले या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो)
दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनी यावरुन एक ट्विट केले आहे. त्यांनी असे म्हटले की, स्थानिक पोलिसांनी तपास करावा की, एनसीबीच्या खासगी सैन्यातील तर ती लोक नाहीत ना. यावर पोलिसांनी असे म्हटले की, त्या लोकांचे शासकीय कंपनी किंवा एखाद्या गँग सोबत संबंध नाही ना याचा तपास करत आहेत.