मुंबई: लॉकेटो ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस व स्पीड डेटिंगच्या नावाखाली ७३ लाखांची फसवणूक; आरोपी अटकेत
Representational Image (Photo Credits: File Photo)

लॉकेटो ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस व स्पीड डेटिंगच्या (Loketo Online Dating Service and Speed Dating) नावाखाली एका व्यक्तीची तब्बल 73 लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादीने खारघर (Kharghar) येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला कोलकाता (Kolkata) येथून तिघांना अटक केली आहे. कंपनीच्या मार्फत डेंटिंगसाठी हव्या असलेल्या त्या मुली त्या संबधित पत्यावर पुरविण्यात येणार असे सांगितले गेले. यासाठी फिर्यादीकडून रजिस्ट्रेशन फी, आयडी फी, अॅग्रीमेंट आदीसाठी रक्कम भरण्यास सांगितले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे कळताच फिर्यादीने पुढील प्रक्रियेसाठी नकार दिला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला धमकावून 73 लाखांची लूट केली.

फिर्यादीला गेल्या काहीदिवसांपूर्वी लॉकटो ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस व स्पीड डेटिंग या बनावट कंपनीतून फोन आला होता. तसेच त्यांच्या कंपनीमार्फत डेटिंगसाठी हव्या असलेल्या मुली संबधित पत्यावर मिळतील अशी माहिती फोनवरून फिर्यादीला देण्यात आली. याकरिता फिर्यादीकडून संबधित फी चे निमित्त सांगून काही पैशांची लूट केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर फिर्यादीने पुढील प्रकियेसाठी पैसे देण्यास साफ नकार दिला. परंतु, फिर्यादीच्या नकारानंतर त्याला विविध मार्गातून धमकविण्यास आरोपीने सुरवात केली. दरम्यान, फिर्यादीला खोट्या नोटीस पाठवणे आणि क्राईम ब्रॅंचच्या नावाखाली खोटे फोन करुन तब्बल 73 लाख 51 हजार 822 रुपयांची लूट केली होती. आपली बदनामी होईल या भितीने फिर्यादीने ही गोष्ट गुपीत ठेवली. परंतु, फिर्यादीने हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल सल्ला दिला. त्यानंतर फिर्यादीने खारखर पोलिसात तक्रार केली. हा सर्वप्रकार कळताच पोलिसांनी आरोपींचा पर्दाफाश केला. हे देखील वाचा- डोंबिवली: जीन्स घालणाऱ्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पीडित महिलेची स्थिती गंभीर

रवी दास, प्रबीर सहा आणि अर्णब सिंग उर्फ निल रॉय असे या आरोपींची नावे आहे. यात आरोपींनी केवळ फिर्यादकडूनच पैसे उकळले नसून मुंबई, नवी मुंबई, बंगळरु, चेन्नई या शहरातील लोकांची लूट केली असल्याचे उघड झाले आहे. सध्या फसवणुकीच्या बातम्यांनी वेग घेतला असून नागरिकांनी अशाप्रकारच्या कोणत्याही फोनला बळी पडू नये, असे अवाहन पोलिसांनी केले आहे.