डोंबिवली: जीन्स घालणाऱ्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पीडित महिलेची स्थिती गंभीर
Representative Image (Photo credits: File Photo)

डोंबिवली (Dombivli) पश्चिम येथील कोपर (Kopar) परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत पत्नीने जीन्स टी-शर्ट घातल्याचा रागातून पतीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समजत आहे. या मारहाणीत पीडित महिलेला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मध्ये पती सुधीर जाधव (Sudhir Jadhav) हा दोषी आढळून आल्याने त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अहमदनगर: Crime Petrol पाहून प्रेयसीचा प्रियकरावर अॅसिड हल्ला; आरोपी युवतीला अटक

प्राप्त माहितीनुसार, कोपर पूर्व परिसरात नवसमर्थ चाळीत सुधीर जाधव आणि पत्नी सुजाता जाधव राहतात. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुजाता घरी आल्या. तेव्हा त्यांनी टीशर्ट व जीन्स पॅन्ट असे कपडे घातले होते. हे पाहून संतापलेल्या सुधीर ने सुजाताशी वाद घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने घरातील काम न करण्यावरून वाद सुरु केला आणि मग विषय वळवून जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालण्यापर्यंत घेऊन येत त्या दोघांमध्ये भांडण वाढत गेले. अहमदनगर येथील आंतरजातीय विवाहाला नवे वळण, पतीनेच पत्नीला जाळले, भावंडांकडून धक्कादायक खुलासा)

काही क्षणातच संतापलेल्या सुधीरने लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण करत तिचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत सुजाता यांना जबर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुजाता यांनी डोंबिवली पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून पोलिसांनी सुधीर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चारित्र्याच्या बीड मध्ये सुद्धा चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला ठार करुन तब्बल 10 मृतदेहाचे तुकडे आपल्या घरातील फ्रिजमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.अशा प्रकारच्या घटना वारंवार होत असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.