
अहमदनगर (Ahamadnagar) येथील प्रेम प्रकरणाला वेगळे वगळ लागले असून आता पतीने पत्नीला जाळले असल्याचे समोर आले आहे. याबद्दल पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पत्नीच्या लहान भावंडांनी त्याचा खुलासा केला आहे.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, रुक्मिणी आण मंगेश रणसिंग यांचा सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. परंतु घरातील मंडळींना याबद्दल कोणताच आक्षेप नव्हता. परंतु लग्नाच्या काही दिवसानंतर रुक्मिणी आणि मंगेश यांच्यात वाद सुरु झाले. तसेच शुल्लक शुल्लक कारणांवरुन मंगेश रुक्मिणीला मारहाण करत असे. त्यानंतर रुक्मिणी माहेरी राहण्यास गेली. तर 1 मे रोजी रुक्मिणीचे आई-वडिल तिला आणि भावंडांना घराला कुलूप लावून कामासाठी गेले. त्यावेळी मंगेश ह्याने आपल्या सोबत बाटलीतून पेट्रोल आणले. तर घराला पडलेल्या एका खांड मधून मंगेशने आत प्रवेश करत तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवले.(आंतरजातीय विवाह: लेकीसह जावयाला पेटवले; अहमदनगर येथील घटना)
परंतु रुक्मिणीला पेटवल्यावर तिने मंगेश हिला मीठी मारली. घरातून आरडओरड पाहून आजूबाजूच्या लोकांनी घराजवळ धाव घेतली. त्यानंतर घराचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा प्रथम रुक्मिणी पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर आल्यानंतर मंगेशसुद्धा तिच्या पाठून बाहेर आला. या प्रकरणी रुक्मिणी ही गंभीरपणे भाजली गेली असून तिच्यावर उपाचार करताना मृत्यू झाला आहे. तर आता पोलिसांनी मंगेशच्या फिर्यादीनुसार या प्रकरणी ऑनर किलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.