बीड: धक्कादायक! पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवले
प्रतिकात्मक फोटो | Image only representative purpose (Photo credit: File)

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला ठार करुन तब्बल 10 मृतदेहाचे तुकडे आपल्या घरातील फ्रिजमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बीड (Beed) येथील माजलनगर (Majalnagar) परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने 30 नोव्हेंबर रोजी आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, माजलगाव येथे शहरात अर्धवट जळालेल्या प्रेतामुळे या खुनाचा उलगडा झाला.

संजय साळवे उर्फ अब्दुल रहेमान असे आरोपीचे नाव असून गेल्या काहि वर्षापूर्वी त्याचे रेश्मासोबत प्रेमविवाह झाला आहे. संजय साळवे यांनी कुटुंबियाच्या विरोधात जाऊन रेश्मा हिच्याशी लग्न करण्यासाठी मुस्लीम धर्मही स्वीकारला होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून संजय आणि रेश्मा यांच्यात वाद सुरु होता. चारित्र्याच्या संशायावरुन संजय हा रेश्माशी 30 नोव्हेंबर रोजी भांडण करु लागला. दरम्यान संजयचा स्वत:वरचा ताबा सुटला. यातून त्याने रेश्माचा खून केला. त्यानंतर संजयने रेश्माच्या मृतदेहाचे तुकडे करुन आपल्या घरातील फ्रिजमध्ये 10 दिवस ठेवले. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी संजय याने सोमवारी निर्जनस्थळावर जाऊन रेश्माच्या शरिराचा वरील भाग जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु करुन संजयला अटक केली. हे देखील वाचा- कोल्हापूर: कन्या शाळा सहल बस अपघात, 7 विद्यार्थीनी जखमी

पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह फ्रिजमध्ये तब्बल 10 दिवस ठेवल्याची बातमी कळताच आजुबाजूच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले. एवढेच नव्हेतर, खुनाचा तपास करण्यासाठी आलेले पोलीसही हा धक्कादायक प्रकार पाहून चक्रावले गेले. पत्नीचा खून केल्यानंतरही आरोपी हा त्याच्या मुलांसह घरात राहत होता.