Mumbai: कल्याण रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेन मधून उतरताना पडली महिला, देवदूत बनून कॉन्टेबलने वाचवला जीव
Representational Image (Photo Credits: PTI)

Mumbai: मुंबईतील कल्याण स्थानकात बुधवारी एक महिला चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्यावेळी तिचा तोल जात ती खाली पडत असल्याचे पाहता ड्युटीवर तैनात असलेल्या कॉन्स्टेबलने हे पाहिले. कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता ट्रेन आणि गॅपच्या मध्ये पडण्याआधीच त्यांनी महिलेला वाचवले. महिला ही ठाणे येथे राहणारी नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल मंगेश थेरे यांची कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4/5 वर ड्युटी लावण्यात आली होती. याच वेळी दुपारच्या वेळेस जवळजवळ 2.45 वाजता ट्रेन क्रमांक 01071 कामायनी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर गेली. कामायनी एक्सप्रेस कल्याण स्टेशनाच्या प्लॅटफॉर्मवरुन रवाना सुद्धा झाली. ट्रेन पुढे गेल्याच्या काही सेकंदानंतर जेव्हा ट्रेनने वेग पकडला असता एक महिला त्यामधून उतरण्याचा प्रयत्न करत होती.(Mumbai: एमटीएनएल एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे सांगत निवृत्त इंजिनियरकडून लुटले दीड लाख रुपये)

Tweet:

महिलेने चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आधी तिचे संतुलन बिघडले गेले आणि ड्युटीवर तैनात कॉन्स्टेबल मंगेश थेरे यांनी वेळेचा विलंब न लावता तिचा जीव वाचवला. असे सांगितले जात आहे की, महिला चुकीच्या ट्रेनमध्ये बसली होती. मात्र जेव्हा तिला कळले ती चुकीच्या ट्रेनमध्ये आहे तेव्हा तिने खाली उतरण्याचा प्रयत्न केला.

तुनुगुंटला अरुणा रेखा असे महिलेचे नाव असून ती 62 वर्षाची आहे. अरुणा ठाणे येथील स्थानिक रहिवाशी आहे. महिलेने असे सांगितले की, तिला 01019 कोणार्क एक्सप्रेस मधून जायचे होते पण ती चुकीच्या गाडीत बसली. परंतु जेव्हा चुकीची गाडी आपण पकडल्याचे कळते असता उतरण्याचा प्रयत्न केला. कॉन्स्टेबलने महिलेला कोणार्क एक्सप्रेस आल्यानंतर तिला त्यामध्ये बसवले.