Mumbai: एमटीएनएल एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे सांगत निवृत्त इंजिनियरकडून लुटले दीड लाख रुपये
fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबईतील एका 73 वर्षीय निवृत्त इंजिनियरला एमटीएनएल एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे सांगून त्याला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फोनवरील बनावट व्यक्तीने पीडित इंजिनियरच्या बँक खात्याची माहिती मिळवत एका मोबाइल अॅपच्या माध्यमातून पैसे लूटले आहेत. पोलिसांनी असे म्हटले की, त्यांना मोबाईलवर 26 सप्टेंबरला एमटीएनएलचे काही मेसेज आले होते. त्यामध्ये केवायसी फॉर्म संबंधित सांगण्यात आले होते.

मेसेज मध्ये असेलल्या क्रमांकावर तक्रारदाऱ्यांनी फोन केला असता फोनवरील बनावट व्यक्तीने तो एमटीएनएल एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांना केवायसी फॉर्म भरण्यास मदत करतो असे ही म्हटले. त्यानुसार तक्रारदाराला एक मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास ही सांगण्यात आले. तर अॅपमध्ये दिली गेलेली माहिती ही तिसरा व्यक्ती आणि मोबाईलची स्क्रिन सुद्धा त्याला पाहता येत होती.(IPL Betting Racket चा पर्दाफाश; Palava City मधून रॅकेट चालवणाऱ्या तिघांना अटक)

अॅप इंस्टॉल केल्यानंतर फसवणूकदाराने त्यांना त्यांचे बँक खात्याची माहिती देण्यास सांगितले. तसेच नेट बँकिंगच्या माध्यमातून 10 रुपये प्रोसेसिंग फी सुद्धा भरण्यास सांगितली. तक्रारदाऱ्यांनी त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे केले आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून पैसे ही भरले. परंतु पैसे भरण्यापूर्वी त्याने कोणताही विचार केला नाही आणि फसवणूकदाराला त्यांचे बँक डिटेल्स ही पाहता आले. तर ओटीपी सुद्धा त्याने मिळवत खात्यातून 1.48 लाख रुपये त्याने लुटण्यासाठी त्याने तीन ट्रांजेक्शन्स केले.

तक्रारदाऱ्यांनी त्यांच्या मुलाला फोन करत त्यांना बँक खात्यातून ट्रँजेक्शन झाल्याची माहिती दिली. त्यामुळे या दोघांनी त्याबद्दल बँकेला सांगितले आणि पोलिसात धाव घेत एफआयआर दाखल केला आहे.