ठाणे पोलिसांच्या (Thane Police) कल्याण डीसीपी पथकाने (Kalyan DSP Squad) आयपीएल बेटिंग रॅकेटचा (IPL Betting Racket) पर्दाफाश केला आहे. डोंबिवली (Dombivli) येथील पलावा सिटी (Palava City) मधील फ्लॅटमधून हे रॅकेट चालवणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. आयपीएल सामन्यांवर बोली लावणारी एक वेबसाईट पोलिसांच्या निर्दशनास आली. त्यानंतर तपासाअंती पोलिसांनी तिघांना अटक केली. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रितेश श्रीवास्तव (44), कुणाल दापोडकर (33) आणि निखिल चौर (32) अशी या तिघांची नावे आहेत.
पलावा मधील कॅसरियो गोल्ड बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधून काही लोक आयपीएल वर सट्टा स्वीकारत असल्याची माहिती एपीआय दिनेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील झोन 3 डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या पथकाला मिळाली होती. (IPL 2020 Betting Racket: कर्नाटक पोलिसांकडून आयपीएल बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, रॅकेट चालविण्यासाठी कॉन्स्टेबल अटक)
मिळालेल्या माहितीच्या आधारे, सोनावणे आणि त्यांच्या टीमने स्थानिक पोलिसांसह सोमवारी रात्री त्या फ्लॅटवर धाड टाकली आणि त्या तिघांना अटक केली. हे तिघजण राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात होणाऱ्या आपीएल सामन्यासाठी ऑनलाईन सट्टा स्वीकारत होते.
पोलिसांनी या तिघांकडून सीम कार्डसह 6 मोबाईल फोन्स, सिमकार्ड नसलेले 17 मोबाईल्स आणि 7,65,000 रुपये जप्त केले आहेत. यापूर्वी देखील आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या अनेक रॅकेट्सचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. (Betting App द्वारे नवी मुंबई मधील सिनेमा निर्मात्याची 1.35 लाखांना फसवणूक)
दरम्यान, आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्यावरून पुणे पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. यात दोन जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 92 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती.