नवी मुंबई (Navi Mumbai) मधील कामोठे (Kamothe) येथील एका सिनेमा निर्मात्याची 1.35 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही फसवणूक एका ऑनलाईन बेटिंग गेम (Betting Games) च्या मोबाईल अॅपद्वारे करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांनी (Cyber Fraudsters) गेम्सवर बेटिंग करण्यासाठी एक मोबाईल अॅप बनवला होता. ज्यामध्ये बेटिंग करणाऱ्यांना खूप सारे नफा मिळत होता. पीडित निर्मात्याने या अॅपवर आपला युजर आयडी तयार केला आणि आपले ई-वॉलेट (e-Wallet) या अॅपसोबत लिंक केले. त्यानंतर त्याने आपल्या अकाऊंटमधून या अॅपद्वारे बेटिंगवर पैसे लावण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला लावलेल्या बेटिंगमध्ये त्याला नफा झाला. परंतु, काही काळाने आरोपींनी या व्यक्तीचे अकाऊंट डिलिट करुन त्याच्या खात्यातून 1.35 लाख रुपये लंपास केले. आदित्य सिंह यांनी कामोठे पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर आयपीसी कलम 419, 420, सेक्शन 66 सी आणि सेक्शन 66 डी च्या अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. (Online Fraud in Pune: ज्वेलर असल्याचे भासवून फ्रॉडरकडून दाम्पत्याची 1.22 लाखांना फसवणूक)
6 ऑगस्ट रोजी आदित्य सिंह यांचे मित्र कान्हा सिंह यांनी geekcloudapp.apk आणि betfairapp.apk या दोन फाईल्स डाऊनलोड करुन इस्टॉल करण्यास सांगितले. या फाईल्सद्वारे बेटिंग अॅप मोबाईलमध्ये इस्टॉल झाला आणि याच अॅपद्वारे पीडित व्यक्तीची फसवणूक झाली. (Online Fraud: चीनी नागरिकांकडून 5 लाख भारतीयांची 150 कोटींची फसवणूक; दिल्ली पोलिसांनी केला पर्दाफाश)
दरम्यान, यापूर्वी ऑनलाईन माध्यमातून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोविड-19 लॉकडाऊन काळात या घटनांचे प्रमाण वाढले आहे.