Online Fraud in Pune: ज्वेलर असल्याचे भासवून फ्रॉडरकडून दाम्पत्याची 1.22 लाखांना फसवणूक
Online Fraud | Representational Image | (Photo Credits: Twitter)

ऑनलाईन फसवणुकीची (Online Fraud) अजून एक घटना पुण्यातून (Pune) समोर येत आहे. यात फ्रॉडरकडून तब्बल 1 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. फ्रॉडरने ज्वेलर असल्याचे भासवत एका व्यक्तीला तब्बल लाखभर रुपयांना लुटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, फ्रॉडरने ज्वेलर असल्याचे सांगून एका व्यक्तीकडून 245 नोजरिंग्स (Nose Rings) विकण्याच्या बदल्यात 1.22 लाख उकळले आहेत. ही घटना 21 आणि 23 मे रोजी घडली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता चंदननगर पोलिस (Chandannagar Police) आरोपीचा शोध घेत आहेत.

योगेश ठाकूर असे फसवणूक झालेल्या आरोपीचे नाव असून लॉकडाऊनमध्ये पत्नीच्या ज्वेलरी व्यवसायासाठी त्याने 245 नोजपिन्स ऑर्डर केल्या होत्या. ठाकूर दाम्पत्याला ज्वेलरीच्या व्यवसाय असलेल्या आरोपीची प्रोफाईल मिळाली होती. त्यानंतर त्यांनी त्याच्याशी संपर्क केला. आरोपीने सोन्याच्या दागिन्यांचे काही फोटोज ठाकूर यांना पाठवले. ते पाहिल्यानंतर त्यांनी 1 ग्रॅम गोल्डच्या 245 नोजपिन्सची ऑर्डर दिली. त्यावेळी त्यांनी त्याचे सर्व डिटेल्स आधारकार्ड, खरेदीच्या  बिलासह घेतले होते. सर्व डिटेल्स, दागिन्यांचे फोटो पाठवल्याने ठाकूर यांना तो खरा व्यावसायिक असल्याचे पटले आणि त्यांनी नेट बँकिंगच्या माध्यमातून 1,22,836 रुपये फ्रॉडरला पाठवले. (पुणे: डेटिंग अॅपच्या माध्यमातून नाव बदलून तरुणीची फसवणूक; 10 लाखांना घातला गंडा)

पैसे मिळाल्यानंतर एका दिवसात दागिने पाठवते असे फ्रॉडरने ठाकूर दाम्पत्याला सांगितले. मात्र त्यांना दागिन्यांची कोणतीही डिलिव्हरी न मिळाल्याने त्यांनी फ्रॉडरकडे याबद्दल विचारणा केली. तेव्हा डिलिव्हरीला उशीर होत असल्याचे त्याने सांगितले. मात्र काही वेळाने त्याने फोन नंबर ब्लॉक केल्याने ठाकूर यांना संशय आला. ठाकूर यांच्याकडे त्याच्या दुकानाचा पत्ता असल्याने त्याने दुकानाला  भेट दिली तेव्हा अशा पद्धतीने फ्रॉडरने अनेकांना फसवल्याचे त्यांच्या निर्दशनास आले.