Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

पुण्यातून (Pune) एक फसवणूकीची घटना समोर येत आहे. अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी असल्याचं सांगत एका तरुणाने तरुणीला तब्बल 9 लाख 65 हजारांचा गंडा घातला आहे. अमित चव्हाण असं असून तो बारामती (Baramati) येथील रहिवाशी आहे. डेटिंग अॅपवर (Dating App) दोघांची भेट झाली. त्यावेळी त्याने राहुल पाटील असे स्वत:चे नाव सांगितले. तसंच अमेरिकेत गुप्तचर अधिकारी असल्याचंही त्याने सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अमित चव्हाण याला अटक केली आहे.

फसवणूक झालेली तरुणी 28 वर्षांची असून टेक्स्टाईल डिझायनर आहे. मार्चमध्ये अॅपवर ओळख झाल्यानंतर एप्रिलमध्ये ते दोघे भेटले. गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी असून आपल्या कार्याकलयातून तब्बल 154 देशांचं काम चालतं. भारत माझ्या क्षेत्रात येत असल्याने एका तपासानिमित्त मी इथे आलो आहे, असं त्याने तरुणीला सांगितलं. फोन आणि लॅपटॉप फॉरमॅट करण्यासाठी दिला आहे. कामावर तपास संस्थेकडून पाळत ठेवली जाते, असेही त्याने तरुणीला सांगितले. त्यानंतर त्याने तरुणीचा एक लाख रुपये किंमतीचा लॅपटॉप नेला. तो परत दिलाच नाही. (Social Media Fraud: फेसबुकवर मैत्री केल्यानंतर महिलेला घातला 2.5 कोटी रुपयांचा गंडा)

ओळख वाढल्यानंतर गुजरातमधील मित्रांकडून कमी किंमती टेक्स्टाईलसाठी लागणारा माल खरेदी करू देतो असं सांगुून तरुणीकडून पैसे मागितले. तरुणीने देखील पुढचा मागचा विचार न करता व्यवसाया करता लागणारे पैसे राहुल पाटील उर्फ अमित चव्हाणच्या खात्यात जमा केले. मात्र फसवलं गेल्याचं लक्षात येताच तिने सायबर पोलिसांत 30 जून रोजी तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, त्याचं खरं नाव अमित चव्हाण असल्याचं उघडकीस आलं. तो 30 वर्षांच्या असून बारामती एमआयडीसी परिसरात राहतो.

यापूर्वी देखील अशाप्रकारे फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कोणाशीही ओळख झाल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवताना त्याचबरोबर आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणे आवश्यक आहे.