Death (Photo Credits-Facebook)

खाण्यापिण्यात विषारी पदार्थ मिसळून पतीचा जीव घेणाऱ्या 45 वर्षीय महिलेला आणि तिच्या प्रियकराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police's Crime Branch) अटक केली आहे. आरोपी महिलेने आपल्या पतीच्या खाण्यापिण्यात तीन महिने हळूहळू आर्सेनिक (Arsenic) आणि थॅलियम (Thallium) मिसळले ज्यामुळे शरीरात विष हळूहळू भिनत (slow poisoning) गेले आणि पतिचा मृत्यू झाला. महिलेचे नाव कविता आणि तिच्या प्रियकराचे नाव हितेंश जैन असे आहे. तर कमलकांत शहा असे मृत पतीचे नाव आहे. पती कमलकांत शाह यांना 3 सप्टेंबर रोजी स्लो पॉयझनिंगमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 17 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही 8 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कमलकांत शाह हे सातत्याने आजारी असत. 46 वर्षीय शाह यांना या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या आजाराचे कारण डॉक्टरांना कळले नाही. डॉक्टरांना सुरुवातीला तपासणी करुनही त्यांच्या आजाराचे निदानच होत नव्हते. दरम्यान, डॉक्टरांनी अधिक बारकाईने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. या वेळी शाह यांच्या शरीरात आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात घातक पदार्थ आढळून आले. (हेही वाचा, नांदेड: प्रेमभंग झाल्याने प्रियकराकडून प्रेयसीची चाकूने गळा चिरुन हत्या)

आझाद मैदान पोलिसांनी एडीआर नोंदवून पुढील तपासासाठी सांताक्रूझ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचवेळी गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला. कमलकांत यांची पत्नी काजल शहा हिने जून ते सप्टेंबर या कालावधीत पतीच्या खाण्यापिण्यात कमी प्रमाणात विषारी आर्सेनिक आणि थॅलियम मिसळल्याचे तपासात समोर आले आहे. या कटात तिचा प्रियकर हितेश जैनही सहभागी होता. यानंतर गुन्हे शाखेने काजल आणि तिचा प्रियकर जैन यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली. प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे.

थॅलियम अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास

थॅलियम (Tl) हे अणुक्रमांक 81 असलेले मूलद्रव्य आहे. संशोधकांनी केलेला अभ्यास सांगतो की, थॅलीयम मानवी शरीरात गेल्यास त्याचा हानिकारक परिणाम दिसतो. थॅलीयम मर्यादित प्रमाणात मानवी शरीरात गेल्यास मज्जासंस्थेवर, फुफ्फुसावर, हृदयावर, यकृतावर आणि मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. परंतू, मर्यादित कालावधीत ते मोठ्या प्रमाणावर शरीरात (अन्न-पाण्यातून) गेल्यास तात्पुरते केस गळणे, उलट्या होणे आणि जुलाब देखील होऊ शकतात. त्याचे शरीरात जाण्याचे प्रमाण अधिक असल्यास अथवा एखादा व्यक्ती थोड्या काळासाठी मोठ्या प्रमाणात थॅलियमच्या संपर्कात आल्यानंतर मृत्यू होऊ शकतो. होऊ शकतो.

ट्विट

आर्सेनिक अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास

पिण्याचे-पाणी आणि अन्न यामधून आर्सेनिकच्या दीर्घकाळ संपर्कामुळे कर्करोग आणि त्वचेचे आजार होऊ शकतात. त्यातून उद्भवणारे आजार हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेहाशी देखील संबंधित असू शकतात. गर्भाशयात आणि बालपणातील र्सेनिकचा संपर्क संज्ञानात्मक विकासावर नकारात्मक परिणामांशी आणि तरुण प्रौढांमधील वाढत्या मृत्यूशी मोठ्या प्रमाणावर असल्याचे आढळून आले आहे.