नांदेड: प्रेमभंग झाल्याने प्रियकराकडून प्रेयसीची चाकूने गळा चिरुन हत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

नांदेड (Nanded) मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रेमभंग झाल्याने प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरुन तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवी गौर (22) असे या मृत मुलीचे नाव आहे. तर सुरेश शेंडगे असे आरोपीचे नाव आहे. न्युज 18 लोकमत ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.  (Nagpur Shocker: मोबाईल देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलाकडून 23 वर्षीय मित्राची हत्या)

वैष्णवी ही नांदेड मधील शारदानगर येथील झेंडा चौक परिसरात भाड्याच्या खोलीत आपल्या आई-वडीलांसोबत राहते. तिचे वडील एका खाजगी शाळेत सुरक्षा रक्षक आहेत. तर आई बांगड्यांचे दुकान चालवते. वैष्णवी कॉलेजमध्य शिकत होती. त्याचबरोबर घर चालवण्यासाठी एका खाजगी संस्थेत नोकरीही करत होती. मागील 3 ते 4 वर्षांपासून तिचे आरोपी सुरेश शेंडगे सोबत होते. (Thane: जीम मालकाच्या छळाला कंटाळून कंत्राटदाराची गळफास लावून आत्महत्या)

आरोपी सुरेश हा मोबाईलच्या दुकानात कामाला आहे. काही दिवसांपासून वैष्णवी आणि सुरेशमध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि त्यानंतर तिने प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे सुरेश नैराश्यात गेला होता. आज दुपारी तो वैष्णवीच्या घरी गेला तेव्हा ती एकटीच घरात होती. त्यावेळी सुरेशने तिला जाब विचारला असता दोघांमध्ये भांडण सुरु झाले. त्यानंतर रागाच्या भरात सुरेशने चाकूने तिच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले असून वैष्णवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.