Nagpur Shocker: मोबाईल देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलाकडून 23 वर्षीय मित्राची हत्या
Kill | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मोबाईल फोन (Mobile Phone) देण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलाने आपल्या 23 वर्षीय मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर (Nagpur) मधून समोर आला आहे. परसोनी पोलीसांनी (Parseoni Police) शनिवारी (23 ऑक्टोबर) या प्रकरणाची माहिती दिली. शुक्रवारी (22 ऑक्टोबर) रात्री ही घटना घडली असून प्रीतम कामडे (Pritam Kamade) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. (धक्कादायक! भावावर व बहिणीवर आई-वडिलांचे जास्त प्रेम; रागाच्या भरात 17 वर्षांच्या मुलीने केली कुटुंबातील 4 जणांचा हत्या)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने कामडे याच्याकडे मोबाईल फोन मागितला. मात्र बॅटरी संपल्याचे कारण देत त्याने तो देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने कामडे याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. कामडेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला काही वेळात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती परसोनी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (मेरठ: मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली सावत्र आईची हत्या)

मोबाईल आणि हेडफोन परत मागितला म्हणून मित्राची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उल्हासनगर मधून समोर आली होती. दरम्यान, मोबाईल देण्यास, गेम खेळण्यास नकार दिल्याने हत्या किंवा आत्महत्या करण्याच्या घटना गेल्या काही काळापासून सातत्याने समोर येत आहेत. तर किरकोळ वादातूनही हत्या झाल्याची प्रकरणं उघडकीस आली आहेत. त्यामुळेच रागावर नियंत्रण मिळवणे, ती व्यक्त करण्याची पद्धत याची शिकवण घरातून मिळणे आता महत्त्वाचे झाले आहे.