Image used for represenational purpose (File Photo)

उल्हासनगर (Ulhasnagar) शहरात शनिवारी एका गुंडाची हत्या (Murder) करण्यात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. या घटनेला 24 तास उलटले नाही, तोच एका तरूणाने किरकोळ वादातून मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (18 सप्टेंबर) घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी (Vitthalwadi Police) आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एकाच दिवशी दोन हत्येच्या घटना घडल्याने शहरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सोनावणे असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर हा आरोपी सुरज शिंदे आणि अन्य दोन जणांसोबत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान टेकडी परिसरात दारु पिण्यासाठी गेला होता. दरम्यान, सुरजने ज्ञानेश्वरकडून त्याचा मोबाईल आणि हेडफोन घेतला. त्यानंतर दारू पिऊन घरी जात असताना ज्ञानेश्वरने त्याचा मोबाईल आणि हेडफोन सुरजला परत मागितला. याच वादातून सुरजने ज्ञानेश्वरला चोकू भोसकून त्याची हत्या केली. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ज्ञानेश्वरचा मृतदेह रुग्णालयात पाठवला आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Pune Shocker: लिव्ह इन रिलेशनशीप मधून जन्माला आलेल्या 13 दिवसाच्या बाळाला बापानेच संपवलं; अडीज वर्षाने उघडकीला आली धक्कादायक घटना

उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. उल्हासनगर येथे कालच सुशांत गायकवाड या गुडांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उल्हासनगरमध्ये हत्येचा आणखी एक प्रकार घडल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.