प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : You Tube)

पुण्यात (Pune) अवघ्या 13 दिवसाच्या बाळाचा खून झाल्याची घटना तब्बल अडीज वर्षांनी समोर आल्याची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) जन्माला आलेलं बाळ त्याच्याच बापाने ठार केल्याचं आता समोर आलं या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, आरोपी शुभम आणि पीडीत महिला एकाच कंपनीमध्ये कामाला होते. सुरूवातीला त्यांची मैत्री झाली. मैत्रीतून प्रेमात पडले आणि कालांतराने ते एकत्र रहायला लागले. त्यांना प्रेमसंबंधांमधून 2019 साली एक मुलगा झाला होता. शुभमने त्याची पार्टनर गरोदर असल्याचं समजताच तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं. पुण्यात ससून हॉस्पिटल मध्ये 14 मार्च 2019 ला बाळाला जन्म दिला. बाळाची प्रकृतीपण उत्तम होती. दरम्यान लिव्ह इन रिलेशनशीपमधून झालेल्या बाळाला आश्रमामध्ये ठेवतो असं सांगून आरोपी दाट झाडीमध्ये बाळाला टाकून आला. (नक्की वाचा: धक्कादायक! गर्भापात करुन 5 महिन्याचे अर्भक नदीत फेकले; अनैतिक संबधातून कुमारी मातेने नवजात बाळाला जन्म दिल्याची शक्यता).

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याने बाळाच्या आणि आपल्या भविष्याचा विचार करता आपण त्याला आश्रमामध्ये ठेवू असं आरोपीने त्याच्या मैत्रिणीला समजावलं.तिने बाळाला भेटूया असं वारंवार सांगितलं पण प्रत्येक वेळेस आरोपी तिला उडवाउडवीची उत्तरं देत टाळत होता. यावरूनच तिला बाळाचं काही बरे वाईट झालं असावं अशा संशय बळावला आणि तिने पोलिसांकडे धाव घेतली.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत शुभम भांडे आणि योगेस काळे या दोन 22-23 वर्षांच्या मुलांना ताब्यात घेतलं. त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. बाळाला डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर बाळाला आश्रमात सोडतो असे सांगून विमानतळ परिसरात झाडा-झुडपामध्ये बाळाला टाकलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांना बाळाच्या काही वस्तू देखील आढळून आल्या आहेत. त्यावरून पुढील तपास सुरू आहे.