धक्कादायक! गर्भापात करुन 5 महिन्याचे अर्भक नदीत फेकले; अनैतिक संबधातून कुमारी मातेने नवजात बाळाला जन्म दिल्याची शक्यता
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

गर्भापात करुन 5 महिन्याचे अर्भक नदीच्या पात्रात फेकल्याने सर्वांनाच मोठा धक्का लागला आहे. ही घटना यवतमाळ येथील नूर येथे आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. ग्रामस्थाने नदीच्या पात्रात अर्भक तरंगताना पाहताच ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. हे अर्भक पुरुष जातीचे असून अनधिकृत रुग्णालयात हा गर्भपात करण्यात आला किंवा अनैतिक संबधातून जन्मलेले अर्भक असावे, असा अंदाज स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी पोलीस आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांची अधिक चौकशी करत आहेत.

सोमवारी सकाळी कोणीतरी अज्ञात मातेने 5 महिन्याच्या अर्भकाला नदीच्या पात्रात फेकून दिले. मात्र,  कामासाठी गेलेल्या एका ग्रामस्थानी सकाळी सहाच्या सुमारास अर्भाकाची नाळ पिण्याच्या पाईपलाईन अडकल्याचे पाहिले. त्यानंतर या ग्रामस्थाने स्थानिक पोलिसात कळवले. स्थानिक पोलीसांनी वेळ घालवता घटनास्थळी धाव घेतली. हे अर्भक 5 महिन्याचे असून अनधिकृत रुग्णालयात हा गर्भपात करण्यात आले असावे किंवा अनैतिक संबंधातून या नवजात बाळाला जन्म दिला असावा असा, अंदाज स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच हे अर्भक जवळच्या परिसरातील आहे, असा संशय पोलिसांना आहे. यामुळे पोलीस आजूबाजुच्या परिसरातील अधिक चौकशी करत आहे. दरम्यान, अर्भकाला बघण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. हे देखीला वाचा- स्वत:च्या लग्नात नागिन डान्स करणे नवरदेवाला पडले महागात

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, माजी नगरसेवक सुनील खाडे यांनी पोलिसांना पाचारण केले. सदर प्रकरणाचा तपास नेर पोलीस स्टेशन ठाणेदार पी.एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश इंगळे, स्वप्नील निराळे या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत