स्वत:च्या लग्नात नागिन डान्स करणे नवरदेवाला पडले महागात
Representational Image (Photo Credits: File Image)

स्वत:च्या लग्नात नागिन डान्स करणे एका नवरदेवाला डान्स केल्यामुळे नवरीने त्याला घटस्फोट दिला आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली येथे शुक्रवारी घडली आहे. वरमाळा गळ्यात पडल्यानंतर नवरदेवाने आनंदात दारु सेवन करुन नागिन डान्स केला, ही गोष्ट नवरीला आवडली नसल्यान तिने मंडपातच लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.भरमंडपात नवरीने नकार दिल्याने नवरदेवाचा संसार सुरु होण्याआधीच मोडल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का लागला आहे. तसेच दोन्ही कुटुंबियांकडून आपण दिलेल्या भेटवस्तू परत मिळाव्यात म्हणून स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

पती-पत्नी काही कौटुंबिक कारणांवरुन वाद झाल्याच्या घटनासमोर येत असतात. पण त्यातील काही भांडण ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अशीच एक विचित्र घटना ही उत्तर प्रदेशाच्या बरेली येथे घडली आहे. खरी जिल्ह्यातील एका लग्न सोहळ्यादरम्यान नवरीच्या कुटुंबियांना लग्नाच्या मंडपात नवरदेवाचा वागणे आवडले नव्हते. यातच नवरदेवाने वधूच्या गळ्यात माळा टाकल्यानंतर काहीवेळाने आनंदाच्या भरात स्टेजवर नागिन डान्स करु लागला. मात्र, नवरदेवाचा नागिन डान्स न आवडल्याने नवरीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! पत्नीचा इतर पुरुषांसोबत लीक झालेला अश्लील व्हिडिओ पाहून पतीने केली आत्महत्या

मंडपात लग्न मोडल्याची ही पहिला घटना नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथे एका लग्न सोहळ्यात वराची वागणूक पसंत न आल्याने वधूने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान वराने अधिक दारुचे सेवन केल्याचे समजले होते.