धक्कादायक! पत्नीचा इतर पुरुषांसोबत लीक झालेला अश्लील व्हिडिओ पाहून पतीने केली आत्महत्या
Representational Image (Photo Credits: ANI)

पत्नीचा अन्य पुरुषांसोबत लीक झालेला अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर पतीला हा धक्का सहन न झाल्याने विषारी पदार्थाचे सेवन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना हरियाणातील यमुनानगर (Yamuna Nagar) येथे घडली. बलबीर सिंग असे मृताचे नावा आहे. लग्न झालं असतानाही महिलेने इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. त्याचा व्हिडिओही लिक झाला होता. हा व्हिडिओ पतीने पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमिन हादरली. आणि रागाच्या भरात पतीने आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

प्राप्त माहितीनुसार, यमुनानगर जगाधरी येथे राहणा-या बलबीर सिंगच्या पत्नीने गेल्या काही दिवसांपासून इतर पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवले होते. या गोष्टीची बलबीरला जरासुद्धा कल्पना नव्हती. मात्र त्याच्या पत्नीचा पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा व्हिडिओ लीक झाला आणि हाच व्हिडिओ नेमका बलबीरने पाहिला. त्याच्यासाठी ही गोष्ट खूपच धक्कादायक होती. हा व्हिडिओ पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली या धक्क्याने आणि आपला अनावर झाल्याने त्याने विषारी पदार्थाचे सेवन करुन आपले आयुष्य संपवले.

हेदेखील वाचा- रात्रीच्या काळोखात बायकोने कापले नवऱ्याचे गुप्तांग

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून पोलीस अधिक तपास करत आहे. बलबीरने आत्महत्येपूर्वी 3 पानी लिहिलेले सुसाईट नोट पोलिसांच्या हाती लागले आहेत. ज्यामध्ये पत्नीच्या या कृत्याचा आपल्याला धक्का बसल्या कारणाने आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहिले आहे.

याउलट काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. ज्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गळा चिरून पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. ही घटना कल्याणधील (Kalyan) उंबर्डे परिसरात घडली. रेखा असं या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण येथील वसंत चाळीत विक्रम कुमार आणि रेखा हे जोडपे राहत होते.गेल्या काही दिवसांपासून या दोघांत वाद सुरु होता. पत्नी रेखाचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहे, असा संशय विक्रम कुमारला आला होता. म्हणून 30 ऑगस्ट रोजी विक्रमने गावी जाण्यासाठी ट्रेनची तिकिट बुक केली होती. पण पत्नी रेखा गावी जायला तयार नव्हती, यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाली होती. या भांडणातून विक्रमने पत्नीचे हात-पाय बांधून तिचा गळा चिरुन खून केला, असं पोलिसांनी सांगितले.