Haryna Crime: संतापजनक! प्रेमाला नकार दिल्यामुळे वरिष्ठ डॉक्टराकडून विद्यार्थींनीचा शारीरिक छळ, गुन्हा दाखल

डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना, रोहतक येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणाच्या रोहतक येथे पीजीआयमधील बीडीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीवर एका डॉक्टरने मारहाण केले.

Haryna Crime: संतापजनक! प्रेमाला नकार दिल्यामुळे वरिष्ठ डॉक्टराकडून विद्यार्थींनीचा शारीरिक छळ, गुन्हा दाखल
Physical torture of students Photo Credit TWITTER

Haryna Crime: डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना, रोहतक येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणाच्या रोहतक येथे पीजीआयमधील बीडीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीवर एका डॉक्टरने मारहाण केले. पीडित तरुणीने या प्रकरणी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला आहे. डॉक्टरांनी मारहाण केलेल्या जखमा व्हिडिओत दाखवत आहे. (हेही वाचा- पार्टीवरून उशीरा घरी परतणाऱ्या तरुणीवर बलात्कार; लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वारानेच केले दुष्कृत्य)

मिळलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थीनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पीडितेने सांगितले की, एका वरिष्ठ डॉक्टरानी काही महिन्यापासून माझ्यावर अत्याचार केला. सतत मानसिक आणि शारीरिक अत्याचार करायचा. डॉक्टर मनिंदर कौशिक असं अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने प्रेम संबंध ठेवण्यासाठी अनेकदा जबरदस्ती केली. नकार दिल्यानंतर त्याने चाकूने अंगावर हल्ला केला. प्रेमाला नकार देत असल्यामुळे त्याने मानसिक आणि शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.

वरिष्ठ डॉक्टर हे पीडितेच्या कॉलेजमध्ये होते. या घटनेनंतर कॉलेजमधून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर कोशिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला १२ तासांच्या आत अटक केली. पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे. पीडितेने सांगितले की. १६ ऑगस्ट ते १७ ऑगस्टपर्यंत हल्ला १२ तास चालला. हल्लेखोराने चाकूने धमकावले. अंगावर अनेक जखमा झाल्या. अनेकदा तीला वर्गात हजर असताना गैरहजर दाखवल्याचे आरोप पीडितेने केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 19, 2024 09:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).