रात्रीच्या काळोखात बायकोने कापले नवऱ्याचे गुप्तांग
Woman chops off husband's genitals suspecting extramarital affair | (Photo courtesy: archived, edited, representative image)

संशय हा वाईटच. तो प्रेमातला असो किंवा व्यवहारातला. केवळ संशयातून केले जाणारे कृत्य तर त्याहून भयंकर. ओडीसा (Odisha) राज्यातील एका पती आपल्या पत्नीकडून असाच अनुभव आला. रात्रीच्या गर्द अंधाराचा फायदा घेऊन एका पत्नीने आपल्या पतीचे चक्क गुप्तांग (Genitals)कापले. वेदनेने तडफडणाऱ्या पीडित पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ही घटना भूवनेश्वरपासून 524 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या नबरंगपूर जिल्ह्यातील एका गावात घडली. या प्रकरणात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध (Extramarital Affair) असल्याचा संशय होता. केवळ संशयाच्या जोरावर तिने इतके मोठे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी पती पत्नी झोपले होते. रात्रीच्या अंधारात पती झोपला होता. मात्र, याच अंधाराचा फायदा घेत पत्नीने त्याच्या गुप्तांगावर शस्त्र चालवले आणि ते कापले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी आरोपी महिलेला (पत्नी) ताब्यात घेतले आहे. पीडित पती हा तामिळनाडू येथे नोकरी करतो. तिनच महिन्यांपूर्वी तो आपल्या घरी आला होता. दरम्यान, पत्नीने त्याच्यासोबत असे कृत्य केले. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारानंतर पीडित पती वेदनेने आक्रोश करु लागला. त्याचा आक्रोश पाहून शेजारी जागे झाले व त्यांनी पीडिताच्या घरात प्रवेश केला. दरम्यान, त्याची गंभीर स्थिती पाहून शेजाऱ्यांना धक्का बसला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देत पीडित पतीला रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा, ठाणे: महिलेने कापले तरुणाचे गुप्तांग; तिघांना अटक)

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ओडिसातून अशाच प्रकारची एक घटना पुढे आली होती. या घटनेत एका महिलेने आपल्या प्रियकराचे गुप्तांग कापले होते. या महिलेचे पीडित तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. ही घटना ओडिसातील क्योंझर जिल्ह्यात घडली होती. या घटेनेत पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, प्रियकरासोबत झालेल्या टोकाच्या वादविवादानंतर आपण हे कृत्य केल्याचे तिने सांगितले. या घटनेतील पीडित पुरुषाचे नाव राजेंद्र नायक असे होते. तो चेन्नई येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. प्रदीर्घ काळापासून त्याचे संबंधित महिलेसोबत संबंध होते. दरम्यान, तिने त्याच्यासोबत असे कृत्य केले.