ठाणे: महिलेने कापले तरुणाचे गुप्तांग; तिघांना अटक
(Photo courtesy: ANI)

एका महिलेने दोन मित्रांच्या सहाय्याने 30 वर्षीय तरुणाचे गुप्तांग (Genitals) कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घडना ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवली (Dombivli) येथे मंगळवारी घडली. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असून, यात ही महिला आणि तिच्या दोन मित्रांचा समावेश आहे. पोलिसांनी अटक केलेली महिला ही डोंबिवली परिसरातील नांदिवली येथे राहते. संबंधित तरुण हा गेली काही दिवस या महिलेची छेड काढत होता. तसेच, तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता. अनेकदा सांगूनहीआणि विरोध करुनही या तरुणाचे कृत्य सुरुच होते. त्यामुळे त्याला अद्दल घडविण्याच्या हेतूने महिलेने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. मात्र, या घटनेमुळे डोंबिवली परिसारत एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, या महिलेने पीडित तरुणाला रेल्वे रुळाशेजारी असलेल्या निर्जन जागी बोलवले. महिलेवर विश्वास ठेऊन हा तरुणही ठरल्या ठिकाणी आला. या ठिकाणी संबंधीत उपस्थित होती. मात्र, महिलेचे दोन मित्रही येथे आगोदरच दबा धरुन बसले होते. पीडित तरुण त्या ठिकाणी येताच त्यांनी त्याला पकडले. एका झाडाला बांधले. तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर या तरुणाचे गुप्तांग कापले आणि त्याला तिथेच सोडून तिघांनीही पोबारा केला. (हेही वाचा, धक्कादायक! शिक्षिकेला अद्दल घडविण्यासाठी विद्यार्थ्याने मोबाईल नंबर टाकला डेटिंग आणि पॉर्न साईटवर)

मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पुढील उपचारासाठी पीडित तरुणाला एम्स रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र,त्याची प्रकृती गंभीर आहे. महिला आणि तिच्या दोन मित्रांनाही अटक केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.