धक्कादायक! शिक्षिकेला अद्दल घडविण्यासाठी विद्यार्थ्याने मोबाईल नंबर टाकला डेटिंग आणि पॉर्न साईटवर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Image)

गुजरात (Gujrat) मध्ये एका शाळेतील विद्यार्थ्याने शिक्षिकेला अद्दल घडविण्यासाठी तिचा मोबाईल नंबर पॉर्न साईट (Porn Site) आणि डेटिंग साईट (Dating Site) वर टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

अहमदाबादच्या एका शाळेतील विद्यार्थाला त्याच्या शाळेतील वर्तवणूकीवर शिक्षिका वारंवार ओरडत असे. त्यामुळे विद्यार्थ्याने शिक्षिकेला अद्दल घडविण्याचे ठरवून तिचा फोन नंबर आणि फोटो डेटिंग आणि  पॉर्न साईटवर टाकला. त्यानंतर या पीडित शिक्षिकेला वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरुन फोन येण्यास सुरुवात झाली.

या प्रकरणी पीडित शिक्षिकेने पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्यासाठी सायबर आणि गुन्हे शाखेच्या मदतीने शिक्षेकडेचा मोबाईल नंबर टाकलेल्या डेटिंग आणि पॉर्न साईटवरील अकाउंटची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली तेव्हा तो पीडित शिक्षिकेचा विद्यार्थी असल्याचे सत्य समोर आले आहे.