बायकोचा आनंद पाहावला नाही, नवऱ्याने पॉर्न साईटवर टाकले फोटो
पीडित महिला (फोटो सौजन्य - फेसबुक)

एकमेकांपासून गेले 10 महिने वेगळे राहणाऱ्या नवऱ्याने बायकोचे फोटो आणि मोबाईल नंबर पॉर्न साईटवर टाकल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. तसेच नवऱ्याने बायको तिच्या आयुष्यात खुश असल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहिल्याने त्याने हे कृत्य केले आहे.

मनोज कुमार पंत असे या तरुणाचे नाव आहे. मनोजचा 2011 रोजी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर काही महिन्यात बायकोशी त्याचे वारंवार वाद होऊ लागले होते. त्यामुळे या दोघांनी वेगळे राहण्याचे ठरविले. तसेच या दांम्पत्याला एक लहान मुलगी असून ती बायकोकडे राहते. मात्र मनोजची बायको तिच्या आयुष्यात सुखी आहे. तसेच तिने फेसबुकच्या माध्यमातून आपल्या ऑफिसमधील काही सहकाऱ्यांसोबतचे फोटो टाकले होते. या सर्व प्रकारावर मनोजचा डोळा होता. म्हणून तिला अद्दल घडवण्यासाठी त्याने तिच्या फोटोसह मोबाईल नंबर पॉर्न साईटवर टाकला. त्यानंतर या महिलेला विविध नंबरवरुन फोन येण्यास सुरुवात झाली. तसेच एस्कॉर्ट सर्व्हिस साईटवरुन ही तिला लोक त्रास देऊ लागले होते. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाची चौकशी करण्यात आली तेव्हा हा सर्व प्रताप तिच्या नवऱ्याने केला असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आरोपी नवऱ्याला पोलिसांनी अटक करुन तुरुंगात त्याची रवानगी केली आहे.