Indian Wedding (Photo credits: Pixabay)

Bareilly Groom Dies in Accident: उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये लग्नाच्या अवघ्या १२ तासांनंतर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नवरदेवाचा मृत्यू झाल्याने आनंदाचे दु:खात रूपांतर झाले. सतीश कुमार (२३) या तरुणाचा विवाह झाल्याच्या  १२ तासांनंतर बरेली येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली आहे. सतीश कुमार हा  त्याच्या चुलत भाऊ आणि मित्रासोबत मिठाई खरेदी करण्यासाठी गेला असता उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची एसयूव्ही धडकली. यात विजेश कुमार आणि सतीश यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बरेलीच्या इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ढाब्याजवळ एक ट्रक उभा होता. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या कारचे नियंत्रण सुटले आणि कार ट्रकला येऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, तरुणाचा मृत्यू झाला तर इतर लोक गंभीर जखमी झाले. हेही वाचा: Mumbai Guillain-Barré Syndrome: गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे मुंबईमध्ये पहिला मृत्यू; राज्यातील एकूण मृतांची संख्या 8 वर

या अपघातात नवरदेवासह चार जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीतील मोहल्ला ठाकूर येथील रहिवासी रामसहाय यांचे कुटुंब पंजाबमधील होशियारपूर येथे राहते. त्यांचा मुलगा सतीश याचा विवाह मीरगंजमधील संग्रामपूर गावात राहणाऱ्या स्वाती हिच्याशी झाला होता. लग्नाचे सर्व विधी आटोपून वधूचा घेऊन संपूर्ण कुटुंब घरी परतले. रात्री काही नातेवाईकांसाठी मिठाई घेऊन जात असतांना हा अपघात घडला. बचावलेल्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आनंदाचे दु:खात रूपांतर

UP के बरेली से हैरान करने वाली खबर सामने आई है. सतीश की शादी इसी गुरुवार को मीरगंज के गांव संग्रामपुर निवासी लड़की से हुई. घर में खुशियों का माहौल था, धूमधाम से शादी के बाद दुल्हन का गृह प्रवेश करवाया गया. लेकिन उसी रात सबसे बड़ा 'अनर्थ' हो गया. शादी के 12 घंटे बाद दुल्हन के… pic.twitter.com/IdS7WTsHL6

इज्जतनगर ठाण्याचे पोलीस विजेंदरसिंग सईद म्हणाले कि, 'अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. बेदरकारपणे धोकादायक पद्धतीने वाहन पार्क करणे आणि मृत्यूला बळी पडणे या आरोपाखाली ट्रक चालका विरुद्धगुन्हा दाखल केला आहे.