
Thane: कल्याण येथील एका जीम मालकाने कंत्राटदारासह अन्य तीन कामगारांना जीममध्ये बंद करुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. मालकाने या सर्वांना त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केलीच पण त्याने त्यांचा छळ सुद्धा केला. कोळसेवाडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस बशिर शेख यांनी असे म्हटले की, प्राथमिक शवविच्छेदनाच्या रिपोर्ट्सनुसार जीम मालकाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि त्यांना कोंडून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी वैभव परब याने मृत कंत्राटदार पुनमा चौधरी याच्यासह त्याच्या तीन कामगारांना उद्घाटनापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी जीममध्ये डांबून ठेवले होते. पूनमा याचे कामगार छोलाराम चौधरी, रमेश चौधरी आणि गोगराम चौधरी यांनी पहिल्याच दिवशी खिडकी उघडून पळ काढला. पण पूनमा याने जीममध्ये थांबून काम पूर्ण करण्याचे ठरविले. कामगारांनी पोलिसांना असे सांगितले की, पुनमा याला परब याने मारहाण सुद्धा केली. तर पुनमा याची हत्या केल्याचा त्यांना संशय होता.(Pune Murder Case: पिंपरी-चिंचवडमध्ये 25 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी 2 जण ताब्यात)
कोळसेवाडी पोलिसांनी असे शवविच्छेदन रिपोर्ट्सनुसार असे म्हटले की, पुनमा याने आत्महत्या केली आहे. तक्रारदार छोलाराम याने असे म्हटले की, पुनमा याने फिटनेस एम्पायर जीमच्या फर्निचरचे काम घेतले होते. परब याने मागणी केली की, कंत्राटदाराला दिलेले 1 लाख रुपये त्याने परत करावे. परब याने असे ही म्हटले की, आपले पैसे परत मिळावे यासाठी पुनमा याची किडनी विक्री करेन असे ही म्हटले होते. पण शुक्रवारी पुनमा याने जीममध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले.
पुनमा याचे नातेवाईकांनी परब यानेच त्याची हत्या केल्याचा आरोप लावला. तर नातेवाईकांना न विचारता प्रथम शवविच्छेदन करण्यात आल्याने त्यांनी पुनमा याचा मृतदेह स्विकारण्यास नकार दिला. त्याचसोबत पुन्हा त्याचे जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात यावे अशी मागणी केली. टाइम्स ऑफ इंडिया यांनी परब याच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्या फोन बंद येत होता.