Badlapur Sexual Assault: बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir) शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचर प्रकरणातील (Badlapur Sexual Assault Case) मुख्य आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीमध्ये मारला (Akshay Shinde Encounter) गेला. आता अक्षय शिंदेच्या आईने मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. कुटुंबाच्या प्रतिष्ठेला आणि कल्याणाला झालेल्या हानीबद्दल मानहानीची कारवाई आणि मीडिया हाऊसकडून 300 कोटींच्या भरीव नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे आणि इतरांविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. राजकीय फायद्यासाठी मुलाची एन्काउंटर हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. तर बदनामीसाठी मीडिया हाऊसकडून 300 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आणि नंतर पोलिस चकमकीत मारल्या गेलेल्या अक्षय शिंदेच्या आईने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर अनेक राजकारणी आणि एका मीडिया हाऊसविरुद्ध मानहानीच्या तक्रारी केली आहे. (Badlapur Sexual Assault: बदलापूर प्रकरणातील आरोपी Akshay Shinde Encounter बाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी अक्षया शिंदेच्या एन्काऊंटर विरोधात पोलिसांची स्तुती केली. बलात्काराच्या प्रकरणांमध्ये चकमकी घडवून आणल्या, अशा विधानांचा हवाला देऊन राजकारणी आणि त्यांच्या समर्थकांनी एन्काउंटरला मान्यता दिल्याचा आणि न्यायालयीन व्यवस्थेला कमजोर केल्याचा आरोप कायदेशीर याचिकेत करण्यात आला आहे.
अलका शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्या्ंच्या कुटुंबाला सामाजिक द्वेषाचा सामोरे जावे लागले. राजकारण्यांनी त्यांच्या मुलाला "राक्षस" म्हणून संबोधले. त्याच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कारांना विरोध केला. अक्षय शिंदे याच्या आईच्या युक्तिवादानुसार त्यांच्या मुलाला निर्णय येण्याआधीच दोषी घोषित करण्यात आले होते. ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची रोजीरोटी उद्ध्वस्त केली आहे. त्यांना जगण्यासाठी कष्ट घ्याने लागत आहेत.