Mobile Game Addiction: मोबाईल आणि ऑनलाईन गेम खेळण्यास रोखले, नैराश्येतून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या
Mobile Addiction | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईतील मालाड मालवणी येथे एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या वडीलांनी त्याला रात्री उशिरापर्यंत मोबाइल गेमिंगला (Mobile Addiction) विरोध केल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मुलाच्या गेमींग आणि मोबाईलच्या तीव्र व्यसनाबद्दल चिंता वाटल्याने वडिलांनी त्याचा फोन काढून घेतला होता. ज्यामुळे तो प्रचंड नैराश्येत (Depression) गेला आणि त्यातच त्याने स्वत:ला न सावरता टोकाचे पाऊल गाठले. वडिलांनी मुलाचा फोन जप्त केला आणि त्याला झोपण्यास सांगिले. त्यामुळे हा मुलगा प्रचंड चिडचिडा झाला होता.

छताला लटकता मृतदेह पाहून कुटुंबाला धक्का

मुलाला झोपयला सांगून वडील आणि सर्वच कुटुंबीय झोपी गेले. दरम्यान, नेहमीप्रमाणे सर्वजण सकाळी उठले तेव्हा कुटुंबीयांना मुलाचे शरीर छताला लटकलेले आढळून आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर खूपच उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. मालवणी पोलिसांनी वडिलांचे जबाब नोंदवून अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. मोबाइल गेमिंगच्या व्यसनाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन मालवणी पोलीस मुलाच्या मृत्यूच्या आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा तपास करत आहेत.

मोबाईल आणि व्हिडिओ गेमचे व्यसन

माहिती तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आणि सामाजिक घडामोडींचे विश्लेषक, मानसोपचारतज्ज्ञांबाबत मोबाईल आणि व्हिडिओ गेमच्या व्यसनांबद्दल संवाद साधला असता ते सावधानतेचा ईशारा देतात. अनेक अभ्यासकांसोबत बोलल्यानंतर पुढे येणारा सर्वसाधारण निष्कर्ष असा की, दररोज अनेक तास किंवा जास्त वेळ व्हिडिओ गेम खेळणे एखाद्याच्या एकूण आरोग्यावर आणि उपजीविकेवर नकारात्मक परिणाम करू शकते. जे आर्थिक, शिक्षण, सामाजिक संबंध आणि व्यसनाधीन समस्यांना कारणीभूत ठरू शकते. जगभरामध्ये मोबाइल गेमचे व्यसन वाढतच चालले आहे, विशेषत: मोबाइल उपकरणांमुळे वापरकर्त्यांना काही टॅपसह हजारो गेममध्ये प्रवेश करणे सोपे झाले आहे.

व्हिडिओ गेमचे फायदे

नोकरी, व्यवसाय, दैनंदिन काम, कामातील सारकेपणा, कुटुंब, शिक्षण आणि जीवनातील इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचा समावेश असलेल्या दैनंदिन त्रासातून व्हिडिओ गेम काही काळासाठी विरंगूळा देऊ शकतात. मनाला काहीसा विरंगुळा आणि मनावर आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी मोबाईल गेम फायदेशीर असता. नेहमीच्या कटकटींपासून त्या काही काळासाठी सूटका देतात. परंतू, त्याचा संयमितपणे आनंद घेतला तरच व्हिडिओ गेम उत्तम मनोरंजन देतात. मात्र, त्याचा अतिरेक झाल्यास लोकांना त्याचे व्यसन लागू शकते. इतकेच नव्हे तर नागरिकांमध्य कमालीचे नैराश्य येऊ शकते. त्यामळे विरंगुळा या नावाखाली सुरु केलेला व्हिडिओ गेमचा नाद वेळीच रोखणे आवश्यक ठरते.