Married Man Elope With Girlfriend: कोविड19 मुळे जगणार नाही असे परिवाराला खोटे बोलून नवऱ्याने गर्लफ्रेंडसोबत काढला पळ
Extramarital Affair | Image used for representational purpose. (Photo Credits: File Photo)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) सर्वत्र थैमान घातल्याने चिंता व्यक्ती केली जात आहेच. पण काहींनी कोरोनाचा ऐवढा धसका घेतला आहे की ते त्यांच्यात लक्षण जरी दिसून आली तरीही चाचणी करण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. पण या विरुद्धचा असा एक प्रकार सध्या नवी मुंबईत उघडकीस आला आहे. तो म्हणजे एका विवाहित नवऱ्याने आपल्या परिवाराला मला कोरोना व्हायरस झाल्याचे सांगितले. तसेच आपण यामुळे जगणार नाही असे ही म्हणत चक्क गर्लफ्रेंड सोबत इंदौर येथे पळ काढळल्याची घटना समोर आली आहे. याबद्दल पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे.

पोलिसांनी असे म्हटले आहे की, 24 जुन रोजी मनिष मिश्रा असे व्यक्तीचे नाव असून तो नवी मुंबईतील JNPT येथील एका एजंटकडे नोकरी करणारा सुपरव्हाइजर आहे. या मनिषने आपल्या बायकोला फोन करत त्याला कोरोना झाल्याचे सांगितले. तसेच कोरोनामुळे आपण जगू शकत नाही असे ही पुढे बोलून मोबाईल स्विच ऑफ केला. यामुळे घरातील नातेवाईकांनी तो घरीसुद्धा न आल्याने दुसऱ्या दिवशी लगेच त्याची हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली.(पुणे: कोरोना चाचणी केंद्रावर नागरिकांंनी हल्ला करत स्वॅब नमुने फेकुन दिले, कारण वाचुन माराल डोक्यावर हात Watch Video)

 पोलिसांनी मिश्रा याचा शोध घेण्यासाठी एक टीम तयार केली. तर मिश्रा याने मोबाईल बंद करण्यापूर्वी तो वाशी येथे असल्याचे कळून आले. यावर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली. त्यांना तेथे मोटरसायकल आणि चावी मिळाली. तसेच टीमला तेथे तो ऑफिसला घेऊन जात असलेली बॅग आणि हेल्मेट सुद्धा मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले. पुढे पोलिसांनी मच्छिमारांच्या मदतीने वाशीच्या खाडीत त्याचा मृतदेह आढळून येतो का याचा सुद्धा शोध घेतला असता तो मिळाला नाही. तो जिवंत असल्याच्या विश्सासाखातर आम्ही त्याचा शोध घेतच राहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अखेर पोलिसांनी तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली. तसेच मनिष मिश्रा याचे फोटो देशातील विविध पोलीस दलातील सर्व विभागात सुद्धा पाठवले. नंतर पोलिसांना ऐरोली येथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये असे दिसन आले की, तो एका महिलेसोबत कारमधून प्रवास करत असल्याचे संजय धुमाळ या पोलिसांनी म्हटले. नंतर पोलिसांना असे कळून आले की मिश्रा हा इंदौर येथे राहत आहे.(Coronavirus: मृत्यू येत नाही तर मग कोरोना व्हायरस संसर्गाला घाबरायचं कशाला? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा बिनधास्त सवाल)

 यावर पोलिसांनी त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड केले. तसेच तो इंदौर येथे त्याच्या प्रेयसीसोबत राहत असल्याने पोलिसांच्या टीमला तेथे पाठवून त्याला परत नवी मुंबईत आणल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.