पुण्यातीत भारती विद्यापीठ (Bharati Vidaypith) समोरील कोरोना चाचणी केंद्रावर (Coronavirus Testing Center) आज चाचणी करायलाच आलेल्या नागरिकांंनी हल्लाबोल करत सेंटर मध्ये जमा केलेले स्वॅब नमुने (Swab Samples) सुद्धा फेकुन दिल्याचे समजत आहे. झालं असं की, भारती विद्यापीठ समोर असलेल्या कोरोना चाचणी केंद्रात आपली टेस्ट करुन घेण्यासाठी आज सकाळपासुन अनेक जण रांंग लावुन उभे होते मात्र दुपारपर्यंत टेस्टिंंग किट संंपले आणि अन्य थांंबलेल्यांंची चाचणी घेण्यास आणखीन वेळ लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली याबाबत केंद्रावरील कर्मचार्यांंनी नागरिकांंना माहिती देताच त्यांंचा पारा इतका चढला की त्यांंनी थेट आतमध्ये घुसुन तोडफोड करायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर अगोदरच्या चाचण्यांंमध्ये घेण्यात आलेले स्वॅबचे नमुने सुद्धा नागरिकांंनी फेकुन दिले.
या सगळ्या प्रकारात धक्कादायक म्हणजे नागरिकांंनी तोडफोड करताना फेकलेल्या नमुन्यांंमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे देखील स्वॅब होते, दरम्यान या प्रकरणी आता पुणे महापालिकेकडून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पहा कोरोना चाचणी केंद्रावर नागरिकांंचा हल्ला Video
पुण्यात कोविड टेस्टिंग सेंटरवर राडा, स्वॅब घेतलेले सॅम्पल जमिनीवर फेकले...पाहा VIDEO#Pune #corona #coronavirus #CoronavirusIndia @CMOMaharashtra pic.twitter.com/hX2RTNviU3
— News18Lokmat (@News18lokmat) September 15, 2020
असाच एक प्रसंग पुण्यात आंबेगाव येथील लक्ष्मीबाई हजारे वस्तीगृह येथे सुद्धा झाला होता. याठिकाणी कोरोना चाचणी होत असताना अँटीजेन किट संपल्यामुळे आमची टेस्ट आधी करा, अशी मागणी करत नागरिक कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले होते. यावेळी कर्मचार्यांना मारहाण करत घेतलेले स्वॅबही लाथा मारून खाली पाडून दिले होते.
दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांंनी दिलेल्या माहितीनुसार आज पुणे शहरात 1,691 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत ज्यानुसार एकुण कोरोनाबाधितांंचा आकडा 1,22,448 इतका झाला आहे. आजवरच्या रिकव्हर झालेल्या रुग्णांंचा आकडा 1,02,095 इतका आहे तर एकुण बळींंचा आकडा 2,875 इतका झाला आहे. पुणे शहरात सध्या कोरोनाचे 17,478 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.