Mahila Shikshan Din: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरी होणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
सावित्रीबाई फुले जयंती 2019 (Photo Credit: Facebook Community Page/Wikimedia Commons)

Mahila Shikshan Din: महात्मा जोतीराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे समाजकल्याणासाठी फार मोलाचे कार्य केले आहे. लोकांकडून अपशब्द ऐकून ही सावित्रीबाई यांनी महिलांना शिकवण्याचे सोडले नाही. याच पार्श्वभुमीवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरी करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याच प्रस्तावर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली गेली आहे. त्यानुसार आता सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Savitri Utsav: महाराष्ट्रात दरवर्षी 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती 'सावित्री उत्सव' म्हणून साजरी होणार- Minister Yashomati Thakur)

सावित्रीबाई फुले यांच्यावर सामाजिक बहिष्कार, लोकांकडून दगडांचा मार सहन केला पण त्यांनी महिलांना शिकवणे सोडले नाही. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा महिला शिक्षण दिन साजरा केला जावा अशी मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता तरी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे.(Savitribai Phule Jayanti 2020: 'माता सावित्रीबाई गीत' सहित 'या' 5 गाण्यांमधून जाणून घ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिकेच्या कार्याची महती)

 Tweet:

तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला होता. पुढे 9 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर पती ज्योतीबांनी त्यांना लिहायाला वाचायला शिकविले. त्याकाळी चालू असलेल्या रुढी-परंपरा व कर्मकांड, अस्पुश्यांचा होत असलेला रागद्वेश पाहून ज्योतीबांनी समाजात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवायची ठरवली. याला साथ मिळाली ती त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांची. सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतीराव फुले यांच्या समवेत महिला सबलीकरणामध्ये विशेषत: शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली