महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board Exams 2020) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून (18 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. या परिक्षेला एकूण 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी परीक्षा बसणार आहेत. तर 9771 कनिष्ठ महविद्यालयात ही परीक्षा होणार आहे. महत्वाचे म्हणजे, परिक्षेचा काळ जवळ येताच विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. तसेच परिक्षेचे नियोजन कसे करायचे? असा प्रश्नही विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो. परिक्षा ही केवळ चाचणी नसून उज्जव भविष्य ठरवणारी एक सुवर्ण संधी आहे. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात अनेक परिक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे घाबरण्यापेक्षा या परिक्षेला धैर्याने आणि खंबीरपणे सामोरे जाणे गरजेचे आहे. यासाठी खालील काही टीप्स विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
जीवनात यशवंत होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षा देणे गरजेचे आहे. परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे शास्त्र आत्मसात केले पाहिजे. केवळ उद्या परीक्षा म्हणून आदल्या दिवशी रात्रभर अभ्यास करून चालणार नाही. तर वर्षभर प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करून नियमित अभ्यास करणे गरजेचे असते. मी खूप हुशार आहे, असे म्हणून यश प्राप्त होत नाही. तर, त्यासाठी रोज अभ्यास करावा करणे अधिक महत्वाचे ठरते. हे देखील वाचा- Maharashtra HSC Hall Ticket 2020: महाराष्ट्र बोर्ड 12वी च्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार हॉलतिकीट; mahahsscboard.in वर करू शकता डाऊनलोड
1) पोटभर नास्ता करा-
परीक्षेच्या काळात काही विद्यार्थी चिंतेमुळे सकाळी नास्ता करणे टाळतात, हे अत्यंत चुकीचे आहे. कारण उपाशी राहील्यामुळे तुम्हाला ऍसिडीटी, मळमळ, डोकेदुखी यांसारखा त्रास होऊ शकतो. ज्याचा परिणाम तुमच्या पेपर सोडवण्याच्या परफॉर्मन्सवर पडू शकतो. यासाठी परिक्षेला जाण्यापुर्वी घरातून नास्ता करुन जावे.
2) परीक्षेसाठी वेळेचे नियोजन-
परीक्षेला जाताना खूप आधी जाऊ नका, नाहीतर तिथल्या वातावरणामुळे तुम्ही अधिक नर्व्हस व्हाल. तसेच तिथे गेल्यावर पुन्हा पुन्हा नोट्स वाचत बसण्यापेक्षा शांत रहा. शांत रहाण्यासाठी काही वेळ दीर्घ श्वास घ्या व सोडा ज्यामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल. पहिल्या पेपरच्या दिवशी 1 तास आधी तर, उर्वरित पेपरसाठी अर्धातास आधी परिक्षा केंद्रावर पोहचणे अधिक उत्तम ठरेल.
3) प्रश्नपत्रिका सावधपणे वाचा-
काही विद्यार्थी भरभर प्रश्नपत्रिका वाचतात आणि काही प्रश्नांची उत्तरे न आठवल्यास चिंता करत बसतात. त्याऐवजी शांतपणे प्रश्नपत्रिका वाचा आणि तुमच्या वेळेचे नियोजन करुन येत असलेली उत्तरे आधी लिहा. ज्यामुळे तुम्हाला इतर प्रश्नांची उत्तरे देखील वेळेत आठवतील. इतर मुले किती उत्तरपत्रिका घेतात अथवा तुमचा मित्र किती वेगाने पेपर सोडवत आहे, हे पाहत बसण्यापेक्षा तुमचा पेपर सोडवण्याकडे अधिक लक्ष द्या. त्याचप्रमाणे पेपर सोडवताना प्रत्येक प्रश्नानंतर थोडी जागा ठेवा ज्यामुळे नंतर त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत तुम्हाला काही अधिक माहिती आठवली तर ती लिहिण्यासाठी तुमच्या पेपरमध्ये जागा असेल.
4) पेपरनंतर चर्चा करणे टाळा-
परिक्षा देऊन बाहेर पडल्यानंतर त्या विषयावर चर्चा करत बसू नका. तसेच निष्फळ गप्पा मारण्यासाठी परिक्षा केंद्राबाहेर न थांबता घरी निघून जा. परंतु, अनेकजण परिक्षा देऊन आल्यानंतर काय चुका झाल्या? आणि काय करायला हवे होते? यावर चर्चा करतात. यामुळे पुढील विषयांवर याचा परिणाम होण्याची शक्यता असते.
5) एकाच गोष्टीचा विचार करणे टाळा-
परिक्षा देऊन बाहेप पडल्यानंतर झालेल्या पेपरचा अधिक विचार करणे शक्य तो टाळा. महत्वाचे म्हणजे, जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले असेल तर, काहीच हरकत नाही. त्यावेळी शांत राहून याकडे दुर्लक्ष करा.
6) ब्रेक घ्या-
पेपरवरून घरी आल्यानंतर जेवण केल्यानंतर थोडासा आराम करा. त्यानंतरच पुढील पेपरची तयारी करा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या पेपरचा आभ्यास करताना बरे वाटेल.
परीक्षा पारदर्शी होण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, बैठे पथके यांचा केंद्रावर अंकुश असणार आहे. जर गैरप्रकार करताना कोणता विद्यार्थी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षा व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.