Representational Image (Photo Credits: Facebook)

MSBSHSE HSC Hall Ticket 2020:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार आज (21 जानेवारी) पासून 12 च्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट/ अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. शिक्षणमंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in या वेबसाईटच्या माध्यमातून हे अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. Maharashtra Board HSC Exam 2020 Timetable: 12 वीची परीक्षा 18 फेब्रुवारी पासून सुरू होणार, PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा बारावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक.

महाराष्ट्रातील एचएससी बोर्डाच्या कॉलेजेसना ऑफिशिअल वेबसाईटवरून अधिकृत कॉलेज आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून अ‍ॅडमिट कार्ड/ हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. यंदा महाराष्ट्रात 12 वी बोर्ड परीक्षा (HSC Exam)18 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा 18 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे. पण यंदा बारावी परीक्षेच्या गुणपत्रिका, परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांचं 12 वी परीक्षेचं हॉलतिकीट संबंधित कॉलेजमधून मिळणार आहे. त्यावर प्राध्यापकांची स्वाक्षरी आणि कॉलेजचा स्टॅम्प झाल्यानंतर कॉलेजकडून त्याचं वाटप केले जाणार आहे. दरम्यान याकरिता विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. दरम्यान हॉलतिकीटावर कोणतीची चूक असल्यास त्याला दुरूस्त करण्याचे अधिकार कॉलेजकडे असतील असे नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आले आहे.