MSBSHSE HSC Board Exam 2020 Timetable: बारावीची परीक्षा ही करियरच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा असतो. आज (18 नोव्हेंबर) दिवशी शिक्षण मंडळाकडून महाराष्ट्र राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा करण्यात आल्या आहेत. यंदा बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमार्फत एकाचवेळी बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर मंडळाने वेळापत्रक जाहीर केलं आहे. तर तुम्हांला हे वेळापत्रक डाऊन करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ठेवू शकता. Maharashtra Board Exam 2020 Date Sheet and Timetable: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; mahahsscboard.in वर पहा संपूर्ण वेळापत्रक.
ज्युनिअर कॉलेज आणि त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा स्तरावर नवे नियम लागू करण्यात आले आहेत. बारावीची अंतिम परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत असेल. या परीक्षेत किमान 25% बहुपर्यायी/वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे.
इथे डाऊनलोड करा 12 वी परीक्षेचं वेळापत्रक
18 फेब्रुवारी ते 18 मार्च अशा महिन्याभराच्या काळात पार पडणार्या बारावी परीक्षा 2020 चं वेळापत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
शिक्षण मंडळाने ऑगस्ट 2019 मध्ये जाहीर केलेल्या नियामांनुसार यंदा 12 वी परीक्षा 650 ऐवजी 600 गुणांची घेतली जाणार आहे. हा नवा नियम शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावी साठी लागू करण्यात येईल. सध्या हे अतिरिक्त 50 गुण पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येत आहेत. त्याऐवजी नव्या शैक्षणिक वर्षापासून याचे श्रेणी पद्धतीमध्ये दिले जाणार आहेत. अन्य केंद्रीय मंडळांचा अभ्यासक्रम याचा अभ्यास करुन विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक विषय योजना व मूल्यमापन पद्धती अस्तित्वात आणण्यासाठी समितीकडून करण्यात आलेल्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.