Maharashtra Board Exam 2020 Date Sheet and Timetable: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; mahahsscboard.in वर पहा संपूर्ण वेळापत्रक
Result (Photo Credits: PTI)

Maharashtra Board Exam 2020 Timetable:  महाराष्ट्र (Maharashtra) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या 10वी (SSC) आणि 12वी परीक्षेचे (HSC) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परिक्षा 3 मार्च तर, बारावीच्या या परीक्षेला 18 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. याआधी शिक्षण मंडळाकडून बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक ऑक्टोबर महिन्यात जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे परीक्षा दिलेल्या कालावधीत चालू होणार आहे. महत्वाचे म्हणजे, यावर्षी 17 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना अभ्यासाचे आयोजन करता यावा, यासाठी काही दिवस आधीच बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा 3 मार्च रोजी सुरु होणार असून 23 मार्च रोजी त्यांच्या शेवटचा पेपर असणार आहे. तसेच बारावीच्या परीक्षेला 18 फेब्रुवारी रोजी सुरुवात होणार आहे. या दोन्ही परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर मंडळाच्या mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमार्फत एकाचवेळी बारावी आणि दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. हे देखील वाचा- देशभरात पुढील वर्षी NEET ची परीक्षा 3 मे 2020 रोजी होणार, अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबर पासून सुरु

दहावी, बारावीचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक  करा- 
-दहावीच्या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक
-बारावीच्या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक

दरम्यान, दहावीचे विद्यार्थी बदलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणार आहे. तर पुन्हा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पूर्वीच्या अभ्यासक्रमावर आधारित जुने वेळापत्रक वेगळे जाहीर करण्यात आले आहे. प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना शाळेकडूनच दिले जाणार आहे. यंदा 17 लाखाहून अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत.