Maharashtra Road Accidents Death: महाराष्ट्रात सन 2022 मध्ये 15,000 हून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू; मृतांमध्ये 57% दुचाकीस्वार आणि 21% पादचारी
Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात रस्ते अपघातांमध्ये (Maharashtra Road Accidents Death) होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण आणि धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. सन 2022 या केवळ एका वर्षामध्ये महाराष्ट्रात तब्बल 15,000 हून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. महामार्ग पोलिसांनी राज्यातील अपघात आणि त्यात झालेल्या मृतांची आकडेवारी याबाबत एक अहवाल जाहीर केला. या अहवालातील माहितीनुसार गेल्या वर्षीच्या (2021) मृतांच्या टक्केवारीत यंदा घट झाली असली तरी प्रमाण अद्यापही अधिकच आहे. पाठिमागील दहा वर्षांमध्ये रस्ता अपघातांमध्ये लोकांचे जेवढे मृत्यू झाले नाहीत त्याही पेक्षा जास्त मृत्यू केवळ पाठिमागच्या एका वर्षात झाले आहेत. पाठिमागच्या वर्षभरात सुमारे 15,000 हून अधिक लोकांनी रस्ते अपघातात आपले प्राण गमावले. पाठिमागच्या केवळ चार महिन्यांची आकडेवारी तपासायची तर या चार महिन्यांतच तब्बल 4,922 जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांचा अहवाल सांगतो की, राज्यातील वाहन अपघात आणि त्यात होणाऱ्या मृतांची संख्या पाहता सन 2021 च्या तुलनेत सन 2022 मध्ये त्यात सरासरी 13% वाढ झाली आहे. दुचाकी आणि तिनचाकी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण पाहिले या अपघातांमध्ये झालेल्या मृत्यूंचे प्रमाण 57% इतके आहे. 21% पादचाऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. सन 2020 मध्ये रस्ता अपघातांत पाठिमागच्या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक घट झाल्याचे पाहायला मिळाले. पण, त्या वर्षात कोरोना महामारी उद्भवल्याने सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पुढे लॉकनाऊन शिथील करण्यात आला. त्यानंतर पुढच्याच म्हणजे 2021 मध्ये अपघातांची संख्या अधिक वाढली. (हेही वाचा, Buldhana and Amravati Accident: बुलढाणा आणि अमरावती येथे वेगवेगळे दोन अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांसह 11 ठार)

ट्विट

सन 2022 मध्ये राज्यातील अपघातातील मृतांची जिल्हानिहाय आकडेवारी

पुणे 1634 923 (सर्वात जास्त), अहमदनगर 1616 841, नाशिक 1462 912, यवतमाळ 1209 416, कोल्हापूर 1198 426, सोलापूर 1072 641, नागपूर 1071 492, नागपूर शहर 1080 310 (सर्वात कमी), पिंपरी चिंचवड 1054 371, सातारा 944 534, जळगाव 925 552, चंद्रपूर 840 434, सांगली 808 412, नांदेड 757 379, औरंगाबाद 735 457, बीड 734 462