Coronavirus: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून 218 गुन्हे दाखल
Maharashtra Cyber | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

लॉकडाऊन (Lockdown) काळात राज्यात टिकटॉक (Tick Talk), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter व अन्य सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी आणि इतर गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत 45 जणांना अटक केली आहे. सायबर कायद्याखाली राज्यात एकूण 218 गुन्हे दाखल केले आहेत. यातील 8 गुन्हे अदखलपात्र आहेत. तसेच, ऑडिओ क्लिप्स, YouTube, गैरवापर केल्या प्रकरणी 38 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. खाली दिलेली महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांची जिल्हानिहाय आकडेवारी ही 15 एप्रिल 2020 पर्यंतची आहे

महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांची जिल्हानिहाय आकडेवारी

बीड- 26

कोल्हापूर- 15

पुणे (ग्रामीण)- 15

जळगाव- 13

मुंबई- 12

सांगली- 10

जालना- 09

नाशिक (ग्रामीण)- 9

सातारा- 8

नांदेड- 7

परभणी-7

नाशिक (शहर) -7

ठाणे (शहर)- 6

नागपूर (शहर) 5

सिंधुदुर्ग- 5

नवी मुंबई-5

सोलापूर (ग्रामीण) 5

बुलढाणा-4

पुणे (शहर) 4

लातूर- 4

गोंदिया- 4

सोलापूर (शहर)- 3

रायगड- 2

उस्मानाबाद-2

ठाणे (ग्रामीण) - 1

धुळे - 1

(हेही वाचा, Coronavirus Lockdown च्या काळात अपरिहार्य कारणासाठी मुंबई बाहेर पडायची मिळू शकते परवानगी, mumbaipolice.gov.in वर मुंबई पोलिसांकडे अशी मागा मदत!)

 

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 102 गुन्हे दाखल झाले आहेत. आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 71 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, Titktok विडिओ शेअर केल्याबद्दलही गुन्हे दाखल करण्यात आहेत. हे सर्व गुन्हे आक्षेपार्ह आशय व्यक्त केल्यासंदर्भात आहेत.