Mumbai Police| (Photo Credits: Mumbai Police Twitter)

मुंबईसह भारतामध्ये लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय 14 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. लॉकडाऊन पुन्हा 19 दिवसांनी वाढवल्याने आता अनेकांची महत्त्वाची कामं पुन्हा लांबणीवर पडली आहेत. दरम्यान 20 एप्रिलनंतर प्रत्येक ठिकाणाचा आढावा घेऊन कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात असेल तर काही ठिकाणी संचारबंदी शिथील करण्याची परवानगी मिळू शकते. आता मुंबई पोलिसांकडूनही पुढील लॉकडाऊनच्या काळात अगदीच महत्त्वाच्या कामासाठी कुणाला शहराबाहेर पडायचं असेल तर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. mumbaipolice.gov.in/ApplicationforEmergencyTravel यावर ऑनलाईन किंवा 7738518130 या क्रमांकावर तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी ही माहिती देताच ऑनलाईन पेजमध्ये काही तांत्रिक दोष पहायला मिळाला. सध्या हे पेज ओपन होत नाही. Coronavirus वर मुंबई पोलिसांनी शेअर केले अनोखं ट्विट; 'नुक्कड', 'महाभारत'सह जुन्या शोचं शीर्षक वापरुन दिला घरी बसण्याचा सल्ला.  

मुंबई पोलिसांची माहिती

 

Mumbai Police Tweet | Photo Credits: Twitter

मुंबईत 14 एप्रिलच्या संध्याकाळी वांद्रे परिसरामध्ये अचानक मूळ गावी जाण्यासाठी अनेक परप्रांतीयांची झुंबड उडालेली पहायला मिळाली होती. दरम्यान यावेळी अनेकांनी आम्हांला खायला नको आम्हांला आपच्या मूळ गावी जाऊ द्या. अशी मागणी अनेकांनी केली होती. या घटनेनंतर आता पोलिसांनी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सारे नियम धाब्यावर बसवत अनेक मजूर एकत्र आले होते. त्यावेळेस गर्दी पांगवण्याचं मोठं आव्हान मुंबई पोलिसांसमोर होते. यावेळेस पोलिसांना लाठीचार्ज केला होता.